जालन्यात गॅरेज लाईनला मध्यरात्री आग; शासकीय गोदामही जळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:03 IST2018-01-08T13:02:45+5:302018-01-08T13:03:30+5:30
शहरातील बसस्थानक परिसरातील गॅरेजलाईनला रविवारी मध्यरात्री आग लागली. यात गॅरेज दुकानांसह शासकीय गोदामातील धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अग्निशमन दलाने सात बंबच्या मदतीने तीन तासात आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे कारण कळू शकले नाही.

जालन्यात गॅरेज लाईनला मध्यरात्री आग; शासकीय गोदामही जळाले
जालना : शहरातील बसस्थानक परिसरातील गॅरेजलाईनला रविवारी मध्यरात्री आग लागली. यात गॅरेज दुकानांसह शासकीय गोदामातील धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अग्निशमन दलाने सात बंबच्या मदतीने तीन तासात आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे कारण कळू शकले नाही.
राऊतनगर येथील बसस्थानकान परिसरात गॅरेज लाईन आहे. येथे दहा ते बारा दुकाने आहेत. गॅरेज लाईनच्या समोरच दोन शासकीय धान्य गोदाम आहे. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास एका गॅरेजला आग लागली. गॅरेजमधील आइल, टायर, भंगार यामुळे आग आणखीच भडकली. गॅरजेबाहरे उभ्या असलेल्या काही भंगार गाड्यांनीही पेट घेतला. हवा भरलेले काही टॉयर फुटल्याने समोरच असलेले शासकीय धान्याचे गोदामही पेटले. यामधील धान्याचे आगीमुळे नुकसान झाले. दरम्यान, माहिती मिळताच जालना अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी पोहचले. परतूरचा एक बंबही पोहचला. सात बंबच्या मदतीने अग्निशमन दलाने तीन तासात आगीवर नियंत्रण मिळविल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख जाधव यांनी सांगितले.