पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 01:00 AM2018-10-02T01:00:39+5:302018-10-02T01:00:52+5:30

शासनाच्या कर्जमाफीत बसलेल्या लाभार्थी शेतक-यांना खरीप हंगाम संपत येऊनही अद्याप पर्यंत कर्ज वाटप न झाल्याने बँक आॅफ महाराष्ट्राच्या विभागीय व्यवस्थापकासह शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य भीमराव पाटील डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या शेतक-यांनी ठिय्या आंदोलन केले.

Farmers' agitation for crop loans | पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : शासनाच्या कर्जमाफीत बसलेल्या लाभार्थी शेतक-यांना खरीप हंगाम संपत येऊनही अद्याप पर्यंत कर्ज वाटप न झाल्याने बँक आॅफ महाराष्ट्राच्या विभागीय व्यवस्थापकासह शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य भीमराव पाटील डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या शेतक-यांनी ठिय्या आंदोलन केले.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बँकेमध्ये शेतकरीपीक कर्ज मिळावे म्हणून वारंवार पाठपुरावा करत होते. परंतू, शेतकºयांऐवजी बँकेच्या अधिकाºयांकडून दलालांकडून आलेल्या प्रस्तावावरून निर्णय घेत असल्याचा आरोप संतप्त शेतकºयांनी केला. अशा मुजोर अधिकाºयांविरूध्द तक्रारी करूनही दखल न घेतल्याने शेवटी सोमवारी संतप्त शेतकºयांनी पोलीस ठाणे गाठले. यावेळी संबंधीत अधिकाºयांविरूध्द तक्रार देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक अनिरूध्द नांदेडकर यांची भेट घेऊन त्यांना सत्य परिस्थिती काय आहे याची माहिती भीमराव डोंगरे व अन्य शेतकºयांनी दिली. या तक्रारीची आपण गंभीर दखल घेत असून बँकेच्या व्यवस्थापनाला कळविणार असल्याचे सांगितले. दरम्यान एवढे करूनही व्यवस्थापनाने न ऐकल्यास फसवणूकीचा गुन्हा दाखल करता येईल काय? याची चाचपणी कायदे तज्ज्ञांकडून जाणून घेतल्यावर संबंधीत अधिकारी कर्मचा-यांवर गुन्हा दाखल करू असे नांदेडकर यांनी संतप्त शेतकºयांना सांगून त्यांचा रांग शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विठ्ठलसिंग राजपूत, प्रकाश नारायणकर, प्रल्हाद उगले, विजय डोंगरे, वैजनाथ डोंगरे, श्रीहरी डोंगरे, बाबासाहेब घोलप, नारायण वाघमारे आदींची उपस्थिती होती.
पीककर्ज : लक्ष घाला, अन्यथा आंदोलन />दरम्यान, संतप्त शेतकºयांनी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांची भेट घेतली. त्यांनी शेतकºयांसमोर बँक तसेच पोलीस ठाण्यात जाऊन परिस्थिती किती गंभीर आहे याची माहिती करून दिली. एवढे करूनही जर बँकेचे व्यवस्थापन लक्ष घालत नसेल तर बँकेविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही भीमराव डोंगरे यांनी यावेळी दिला.

Web Title: Farmers' agitation for crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.