जालना ते नांदेड समृद्धी महामार्गावर आठ इंटरचेंज पॉइंट, सात मोठे पूल

By दिपक ढोले  | Published: December 23, 2022 12:40 PM2022-12-23T12:40:43+5:302022-12-23T12:41:01+5:30

भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात : १७९ किलोमीटर लांबीच्या मार्गाला १४ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च

Eight interchange points, seven major bridges on Jalna to Nanded Samriddhi Highway | जालना ते नांदेड समृद्धी महामार्गावर आठ इंटरचेंज पॉइंट, सात मोठे पूल

जालना ते नांदेड समृद्धी महामार्गावर आठ इंटरचेंज पॉइंट, सात मोठे पूल

Next

- दीपक ढोले
जालना :
महाविकास आघाडीच्या सरकारने घोषित केलेल्या जालना ते नांदेड या समृद्धी महामार्गाच्या कामाला वेग आला असून, जवळपास भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहेत. शेतकऱ्यांना मार्च महिन्यांत मावेजा देखील मिळण्याची शक्यता आहे. १७९ किलोमीटर लांबीच्या या महामार्गावर सात मोठे पूल, आठ इंटरचेंज पॉइंट असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गानंतर राज्यात आणखी एका समृद्धी महामार्गाची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती. या घोषणेनंतर जालना ते नादेंड या समृद्धी महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे. या महामार्गाची मोजमाप पूर्ण झाले आहे. शिवाय, भूसंपादनाचे कामही अंतिम टप्प्यात आहेत. यासाठी जवळपास १४ हजार ५०० कोटी रुपये खर्च येणार असून, २२०० हेक्टर जमीन लागणार आहे. तिचे भूसंपादन अंतिम टप्प्यात आले आहेत. हा महामार्ग १७९ किलोमीटर लांबीचा असणार आहे. याचे बांधकाम आरसीसीमध्ये होईल. या महामार्गावर जवळपास सात मोठे पूल असणार आहेत. दोन रेल्वे ओलांडणी पूल राहतील. आठ ठिकाणी इंटरचेंज पॉइंट राहणार आहेत. जवळपास १८ ठिकाणी अंडरपास राहणार आहे. भूसंपादनानंतर मूल्यांकन मागविण्यात आले असून, मार्च महिन्यांत शेतकऱ्यांना मावेजा मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

सहा महिन्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात
मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाचे काम शिर्डीपर्यंत पूर्ण झाले आहेत. नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या मार्गाचे उद्घाटन नुकतेच झाले आहे. या महामार्गाला जोडण्यासाठी जालना ते नादेंड हा समृद्धी महामार्ग तयार करण्यात येणार आहे. हा मार्ग जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतून जाणार आहे. सहा महिन्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

समृद्धी महामार्गाचे भूसंपादनाचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आहे. आता मूल्यांकन मागविण्यात आले आहेत. त्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांची जमीन खरेदी केली जाईल.
- एल. डी. सोनवणे, तहसीलदार, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, जालना

असा असेल महामार्ग
लांबी             १७९.८ कि.मी
बांधणी             आर.सी.सी
मोठे पूल             ७
रेल्वे ओलांडणी पूल २
इंटरचेंज             ८
अंडरपास             १८
भूसंपादनाचे क्षेत्र २२०० हे.आर.
प्रकल्पाची किंमत १४,५०० कोटी

Web Title: Eight interchange points, seven major bridges on Jalna to Nanded Samriddhi Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.