सोशल मीडियामुळे नगरसेवकांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 01:02 AM2018-09-03T01:02:09+5:302018-09-03T01:02:36+5:30

जालना नगर पालिकेत राखीव प्रवर्गातून निवडून आल्यावर त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले होते, त्यांचीही नावे सोशल मीडियावर झळकल्याने रविवारी दिवसभर त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.

Corporators mentality harrased due to social media | सोशल मीडियामुळे नगरसेवकांना मनस्ताप

सोशल मीडियामुळे नगरसेवकांना मनस्ताप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना नगर पालिकेत राखीव प्रवर्गातून निवडून आल्यावर त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले होते, त्यांचीही नावे सोशल मीडियावर झळकल्याने रविवारी दिवसभर त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.
दोन दिवसांपासून जालना शहरात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे चर्चेला उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये निवडुन आल्यावर संबंधितांनी त्यांचे जातवैधता प्रमाणपत्र निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुदतीत हे प्रमाणपत्र सादर न करणा-यांचे पद यामुळे रद्द होणार आहे.
या रद्द होणाºयांमध्ये कोणत्या नगरसेवकांची नावे आहेत, याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. शनिवारी या संदर्भात पालिकेने केवळ १४ नगरसेवकांची यादी जिल्हाधिका-यांकडे सादर केली होती आणि ज्यांनी यापूर्वीच जात वैधता प्रमाणपत्र सादर केले त्यांचीही यादी सोबत जोडली होती. अशांचीही नावे चर्चेत आल्याने अशा नगरसेवकांना मनस्ताप सहन करावा लागला. दिवसभर मत्र, तसेच समर्थकांना उत्तर देताना त्यांच्या नाकीनऊ आले होते.
ज्यांनी यापूर्वी प्रमाणपत्र सादर केले आहे, त्या नगरसेवकांमध्ये मिना घुगे, राहुल इंगोले, जीवन सले, विजय पांगारकर, रफीया बेगम वाजेदखान, शाह आलम खान, आशा ठाकूर, प्रति कोताकोंडा, विना सामलेट, अरूण मगरे आणि निखील पगारे यांचा समावेश आहे.
जालना पािलकेतील ६५ नगरसेवकांपैकी २५ प्रभाग राखीव प्रवर्गासाठी सुटले होते. ज्या १४ नगरसेवकांवर गंडांतर येऊ शकते त्यात काँग्रस ८, राष्ट्रवादी काँग्रेस १, भाजप १, आणि अपक्ष १ यांचा समावेश आहे.

Web Title: Corporators mentality harrased due to social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.