वडीगोद्रीत सशस्त्र दरोडेखोरांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:46 AM2018-08-08T00:46:48+5:302018-08-08T00:47:19+5:30

वडीगोद्री येथे सोमवारी मध्यरात्री एकावेळीच तीन ठिकाणी सशस्त्र दरोडा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरोडेखोरांचा पाठलाग करताना पोलिसांनी सिनेस्टाईल गोळीबार केला, परंतु ऐन वेळेवर पोलिसांचे रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले.

The armed robbers have been arrested | वडीगोद्रीत सशस्त्र दरोडेखोरांचा हैदोस

वडीगोद्रीत सशस्त्र दरोडेखोरांचा हैदोस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : वडीगोद्री येथे सोमवारी मध्यरात्री एकावेळीच तीन ठिकाणी सशस्त्र दरोडा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरोडेखोरांचा पाठलाग करताना पोलिसांनी सिनेस्टाईल गोळीबार केला, परंतु ऐन वेळेवर पोलिसांचे रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार वडीगोद्री येथील राजू छल्लारे यांच्या निवासस्थानी रात्री तीन वाजेच्या सुमारास सात जणांनी प्रवेश केला. त्यांच्याकडे धारदार शस्त्र होते. त्यांनी घरातील व्यक्तींना धमकावून दागिने आणि रोख रक्कम काढून देण्याची मागणी केली. यावेळी छल्लारे यांनी त्यांच्या वडिलांच्या नेत्र शस्त्रक्रियेसाठी राखून ठेवलेले रोख ३० हजार रूपये आणि दागिने असा एकूण ७५ हजार रूपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबविला. छल्लारे यांच्या नंतर डाकूंनी येथीलच सुरेश बाबासाहेब काळे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र काळे यांचा भाऊ नीलेश काळे याला जाग आल्याने त्याने आरडा ओरड केल्यावर डाकू पळून गेले. त्यानंतर चोरट्यांनी बाबूराव भोसले यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर गणेश भोसलेला चाकूचा धाक दाखवून २२ हजार रूपयांची रोख रक्कम लांबविली.
दरम्यान गुरूदेव कॉलनीतील राजू छल्लारे यांचे बंधू ज्ञानेश्वर छल्लारे हे सेतू सुविधा केंद्र चालवत असल्याने घरा समोर सीसीटीव्ही कॅमेरे होते, मात्र चोरट्यांनी शक्कल लढवून सीसीटीव्हीच्या कक्षेत येण्या ऐवजी घराच्या पाठीमागून प्रवेश केला. यावेळी एकूण पाच लुटारू होते. आत प्रवेश केल्यावर दोघेजण राजू छल्लारे यांच्या बेडरूमकडे तर दोघे जण ज्ञानेश्वर छल्लारे यांच्या बेडरूममध्ये आणि पाचव्या चोरट्याने वडिल झोपलेल्या खोलीत प्रवेश करून कुºहाड तसेच चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम आणि दागिन्यांची मागणी केली. यावेळी राजू आणि ज्ञानेश्वर छल्लारे यांनी कुठलाही प्रतिकार न करता त्यांच्याकडे असलेले रोख तीस हजार आणि दागिने चोरट्यांच्या हवाली केले. या चोरीची माहिती इतरांना होऊ नये म्हणून, राजू आणि ज्ञानेश्वर छल्लारे यांचे मोबाईल पळवून नेऊन ते गावाबाहेर फेकून दिले.
चोरट्यांनी चोरी केल्यावर सौंदलगावकडे धाव घेऊन पळून गेले. या चोरीची माहिती वडीगोद्रीतील इतर ग्रामस्थांना कळताच त्यांनी याची माहिती गोंदी पोलीस ठाण्याला कळविली. माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांच्या सोबत गावातील श्रीमंतराव खटके, कुलदीप आटोळे, दिलीप ठाकूर अन्य काही नागरिकांसोबत औरंगाबाद बीड या राष्ट्रीय महामार्गावर त्या दरोडेखोरांचा सिनेस्टाईल पाठलाग केला.
पाठलाग : रिव्हॉल्वर ऐन वेळी ‘लॉक’ झाले... !
वारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या दरोडेखोरांचा सुमारे ८ किलोमीटर पाठलाग केला. पाठलाग सुरू असतानाच दोन गोळया दरोडेखोरांच्या दिशेने झाडल्या तिसरी गोळी झाडताना रिव्हॉल्वरच ‘लॉक’ झाल्याने दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक अनिल परजणे यांनी परिसरात शोधमोहीम राबविली. परंतु ते दरोडेखोर सापडले
नाहीत.
या दरोड्याची माहिती अंबड पोलीस उपविभागीय अधिकारी सी.डी.शेवगण व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना ही माहिती कळाल्यावर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले परंतु चोरट्यांचा माग निघाला नाही. यावेळी ठसे तज्ज्ञानी दरोडेखोरांचे घटनास्थळावरुन ठसे घेतले.

Web Title: The armed robbers have been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.