राजूरला जाण्यासाठी ८० जादा बस सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:11 AM2018-12-22T01:11:35+5:302018-12-22T01:11:57+5:30

भाविकांना अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त राजूरला जाण्यासाठी एस. टी. महामंडळातर्फे ८० बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

80 more buses ready to go to Rajur | राजूरला जाण्यासाठी ८० जादा बस सज्ज

राजूरला जाण्यासाठी ८० जादा बस सज्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भाविकांना अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त राजूरला जाण्यासाठी एस. टी. महामंडळातर्फे ८० बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या बसेस जालना, अंबड, परतूर व भोकरदन या चारही बसस्थानकांतून २५ डिसेंबर या दिवशी सोडण्यात येणार आहेत.
राजूर येथे गणेशाचे साडेतीन पीठापैकी एक पुर्ण पिठ आहे. त्यामुळे येथे प्रत्येक अंगारकी संकष्ट चतुर्थीला मराठवाडा, विदर्भ आदी ठिकाणाहून भाविक गणारायांचे दर्शन घेण्यासाठी येतात.
अंगारकी चतुर्थी ही वर्षातून फक्त एकदा, दोनदा किंवा तीनदा येते.
२५ डिसेंबरच्या संकष्ट चतुर्थीचा योगायोग म्हणजे ही मंगळी चतुर्थी असून वर्षातील शेवटची आहे.
त्यामुळे या चतुर्थीला गणरायाचे दर्शन घेण्यासाठी राजूर येथे भावीक मोठ्या प्रमाणावर येऊ शकतात. यामुळे भाविकांची जाण्या- येण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य महामार्ग परिवहन मंडळातर्फे ८० बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या ८० बसेसपैकी काही बसेस २४ डिसेंबरला मध्यरात्री व काही बसेस २५ डिसेंबरला दिवसा सोडण्यात येणार आहेत.
यामुळे कोणत्याही नागरिकांनी जीव धोक्यात घालून खाजगी वाहनाने प्रवास न करता महामंडळाच्या बसने प्रवास करावा, असे आवाहन एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: 80 more buses ready to go to Rajur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.