जगातील कोणत्या देशांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण अधिक?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 12:01 PM2018-07-30T12:01:58+5:302018-07-30T12:07:59+5:30

अंधश्रद्धा, मुलींच्या मृत्यूचे प्रमाण, कुपोषण अशा अनेक कारणांमुळे स्त्रियांचे प्रमाण जगभरात वेगवेगळे असल्याचे दिसून येते. मात्र काही देशांमध्ये स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्तही आहे. भारतात स्त्रियांचे प्रामण 48.4 टक्के इतके आहे.

Which countries in the world have more female population than male? | जगातील कोणत्या देशांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण अधिक?

जगातील कोणत्या देशांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण अधिक?

googlenewsNext

मुंबई- महिलांचे पुरुषांच्या तुलनेत असणारे प्रमाण म्हणजेच जेंडर रेश्यो किंवा त्यास ह्युमन सेक्स रेश्यो, लिंगगुणोत्तर असं म्हटसं जातं. पुरुषांच्या संख्येमागे स्त्रियांचे प्रमाण अभ्यासासाठी महत्त्वाचे असते. मात्र जगभरात लिंग गुणोत्तर वेगवेगळे आहे. अंधश्रद्धा, मुलींच्या मृत्यूचे प्रमाण, कुपोषण अशा अनेक कारणांमुळे स्त्रियांचे प्रमाण जगभरात वेगवेगळे असल्याचे दिसून येते. मात्र काही देशांमध्ये स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्तही आहे. भारतात स्त्रियांचे प्रामण 48.4 टक्के इतके आहे.

ज्या देशांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे, त्या देशांमध्ये महिला समान वेतनासाठी, समान अधिकारांसाठी जास्त प्रयत्नशील दिसून येतात. मात्र बहुतांश देशांमध्ये महिलांना पुरुषांपेक्षा कमी वेतन असल्याचे साधारण चित्र आहे.
महिलांचे प्रमाण सर्वाधिक क्युराकाओमध्ये असल्याचे दिसून येते. या बेटावर महिलांचे प्रमाण 54.2 इतके आहे. त्याचप्रमाणे लॅटविया, हाँगकाँग. लिथुआनिया, युक्रेन, बेलारुस, रशिया, क्रोएशिया, स्पेन येथेही लोकसंख्येच महिलांचे प्रमाण जास्त आहे. अस्थिर देशांमध्ये म्हणजेच जेथे हिंसा किंवा वंशच्छेदासारख्या समस्या आहेत अशा देशांमध्ये पुरुषांचे महिलांपेक्षा प्रमाण जास्त आहे. अशा देशातून स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होते. मध्यपूर्वेत संयुक्त अरब अमिराती आणि कतारमध्ये स्त्रियांना वर्क व्हीसासाठी अर्ज करणे अत्यंत कठिण असते. अत्यंत कड व्हीसाकायद्यांमुळे महिलांना तसे करणे फारच कठिण जाते. कतारमध्ये महिलांचे प्रमाण सर्वात कमी आहे. तेथे केवळ 24.9 लिंगगुणोत्तर आहे. संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कुवैत, बाहरिन, ओमान येथेही महिलांचे प्रमाण फारच कमी आहे. पर्यावरणविषयक समस्या, युद्धे, साथीचे आजार. वृद्धत्व, युद्धजन्य स्थिती, स्थलांतर अशा अनेक कारणांमुळे लोकसंख्येवर परिणाम होत असतो.

जागतिक बँकेच्या 2017 सालच्या आकडेवारीनुसार महिलांचे लोकसंख्येतील टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे
क्युराकाओ 54.2, लॅटविया 54.1, हाँगकाँग 54, लिथुआनिया 53.9, युक्रेन 53.8, बेलारुस 53.5, रशिया 53.5, एस्टोनिया 53.1, आर्मेनिया 53, एल साल्वाडोर 53, पोर्तुगाल 52.5, अरुबा 52.5, हंगेरी 52.4, जॉर्जिया 52.3, बार्बाडोस 52.1, अँटिग्वा आणि बार्बुडा 52, मकाऊ 52, माल्डोवा 52, अंगोला 52, रवांडा 52, स्पेन 52, ऑस्ट्रिया 52, बहामा 52, सेंट लुईस 52. प्युएर्टो रिको 51.9, श्रीलंका 51.9. क्रोएशिया 51.8, उरुग्वे 51.7, पोलंड 51.7, रुमानिया 51.6, सौदी अरेबिया 42.9, कुवैत 42.6, बाहरिन 37.6, ओमान 34.2, संयुक्त अरब अमिराती 27.6, कतार 24.9

Web Title: Which countries in the world have more female population than male?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.