चंद्रावर जिथं कोसळलं रशियाचं लुना-25, तिथं नेमकं काय घडलं? NASA नं शोधून काढलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 09:57 AM2023-09-01T09:57:45+5:302023-09-01T09:59:54+5:30

प्री लँडिंग ऑर्बिटमध्ये जाण्यापूर्वीच लुना-25 चा ग्राउंड स्टेशनसोबत असलेला संपर्क तुटला आणि नंतर समजले की ते अनियंत्रित होऊन चांद्राच्या पृष्ठभागावर आदळले. आता, ते जेथे कोसळल्याची शक्यता आहे, ती जागा नासाने शोधून काढली आहे.

What exactly happened where the Russian Luna-25 crashed on the moon Discovered by NASA see image | चंद्रावर जिथं कोसळलं रशियाचं लुना-25, तिथं नेमकं काय घडलं? NASA नं शोधून काढलं 

चंद्रावर जिथं कोसळलं रशियाचं लुना-25, तिथं नेमकं काय घडलं? NASA नं शोधून काढलं 

googlenewsNext

वॉशिंग्टन - रशियाचे लुना-25 स्पेसक्राफ्ट हे भारताच्या चंद्रायान- 3 पूर्वीच चांद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणार होते. मात्र प्री लँडिंग ऑर्बिटमध्ये जाण्यापूर्वीच त्याचा ग्राउंड स्टेशनसोबत असलेला संपर्क तुटला आणि नंतर समजले की ते अनियंत्रित होऊन चांद्राच्या पृष्ठभागावर आदळले. आता, ते जेथे कोसळल्याची शक्यता आहे, ती जागा नासाने शोधून काढली आहे. नासाच्या लूनर रिकॉनिसेन्स ऑर्बिटर (LRO) स्पेसक्राफ्टने चांद्रावर एक नवे क्रेटर शोधले आहे. लुना-25 स्पेसक्राफ्ट 19 ऑगस्टला कोसळले होते.

हे स्पेसक्राफ्ट जेथे कोसळल्याची शक्यता आहे, तेथे एक मोठा खड्डा तयार झाल्याचे नासाला आढळून आले आहे. नासाने एक लेखात लिहिले आहे की, रशियन स्पेस एजन्सी रोस्कोस्मोसने 21 ऑगस्टला इंपॅक्ट पॉइंटची शक्यता असलेली जागा दर्शवली आहे. LROC टीम आणि मिशन ऑपरेशन्स टीम 22 ऑगस्तला एलआरओ अंतराळ यानाला कॅप्चर करण्यासाठी डिझाइन करायला आणि संदेश पाठवण्यास सक्षम होता. नासाने म्हटले आहे की, 24 ऑगस्टला दोपारी 2.15 वाजल्यापासून हे फोटो घेण्यास सुवात झाली. याला जवळपास 4 तास लागले. 

किती मोठा खड्डा - 
एलआरओसी टीमने धडकेपूर्वी घेण्यात आलेले फोटो आणि त्यानंतर घेण्यात आलेल्या फोटोंची तुलना केली. यानंतर त्यांना एक छोटा नवा खड्डा आढळून आला. एलआरओने या भागाचा फोटो जून 2022 मध्ये घेतला होता. महत्वाचे म्हणजे हा नवा खड्डा लुना-25 च्या अपेक्षित इंपॅक्ट पॉइंटच्या जवळ आहे. एलआरओ टीमच्या निष्कर्षानुसार, हा खड्डा नैसर्गिकरित्या नव्हे तर मिशनमुळे तयार झाला आहे. हा नवा खड्डा 10 मीटर व्यासाचा आहे. तसेच तो लुना-25 च्या लँडिंग साइटपासून जवळपास 400 किमी दूर आहे.

Web Title: What exactly happened where the Russian Luna-25 crashed on the moon Discovered by NASA see image

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.