२१०० सालापर्यंतचे हवामान अंदाज

By admin | Published: June 11, 2015 11:48 PM2015-06-11T23:48:07+5:302015-06-11T23:48:07+5:30

नासाच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे हवामानात होणारे बदल व पावसाचे प्रमाण याविषयी २१०० सालापर्यंतचे अंदाज व्यक्त केले असून

Weather Forecast for 2100 AD | २१०० सालापर्यंतचे हवामान अंदाज

२१०० सालापर्यंतचे हवामान अंदाज

Next

न्यूयॉर्क : नासाच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे हवामानात होणारे बदल व पावसाचे प्रमाण याविषयी २१०० सालापर्यंतचे अंदाज व्यक्त केले असून, या माहितीचा वापर २१०० सालापर्यंत जगात कोठे असे वातावरण असेल हे जाणून घेण्यासाठी होणार आहे. यासाठी पृथ्वीच्या विविध भागांचे प्रतिनिधित्व करणारी २१ मॉडेल तयार केली असून, त्यावरून अचूक अंदाज बांधणे शक्य आहे. नासाच्या या शास्त्रज्ञात एक भारतीय शास्त्रज्ञही आहे ही अभिमानाची बाब आहे.
या मॉडेलमुळे विविध कालावधीत हवामान कसे बदलेल, पावसाचे प्रमाण किती राहील म्हणजेच वाढत्या तापमानाचा काय परिणाम होईल हे जाणून घेणे शक्य होणार आहे. दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा व कृषी उत्पादनात येणारी तूट यांचेही आकलन करणे शक्य होणार आहे, असे नासाचे प्रमुख शास्त्रज्ञ एलन स्टोफन यांनी म्हटले आहे.
पृथ्वीच्या वाढत्या तापमानाबरोबर आयुष्याची सांगड कशी घालावी याची माहिती या नव्या ग्लोबल डाटासेटवरून मिळणार आहे. नासाच्या नासा अर्थ एक्स्चेंज (एनईएक्स) कार्यक्रमाचे हे नवे उत्पादन आहे. २०१३ साली नेक्सने अमेरिकेसाठी असा माहितीपट तयार केला होता. त्याचाच वापर देशाच्या कृषी क्षेत्र, जंगले, नद्या व शहरावर हवामान बदलाचा काय परिणाम होईल याचा अंदाज घेण्यासाठी केला जात आहे. हवामान संशोधनाचा हा मूलभूत आराखडा असून जगातील विविध प्रदेशांसाठी तो उपयोगी पडण्यासारखा आहे, असे नेक्सचे प्रकल्पशास्त्रज्ञ रामकृष्ण नेमाणी यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Weather Forecast for 2100 AD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.