सू की यांचा वाहनचालक होणार म्यानमारचा अध्यक्ष

By admin | Published: March 11, 2016 03:19 AM2016-03-11T03:19:29+5:302016-03-11T04:08:28+5:30

म्यानमारचे अध्यक्षपद आँग सान सू की यांचा माजी वाहनचालक व अत्यंत विश्वासू तिन यॉ (६९) भूषविणार आहेत. सू की यांनी गुरुवारी यॉ यांचे नाव अध्यक्षपदासाठी जाहीर केले.

Suu Kyi will be the driver of Myanmar's chair | सू की यांचा वाहनचालक होणार म्यानमारचा अध्यक्ष

सू की यांचा वाहनचालक होणार म्यानमारचा अध्यक्ष

Next

नैपिद्वा : म्यानमारचे अध्यक्षपद आँग सान सू की यांचा माजी वाहनचालक व अत्यंत विश्वासू तिन यॉ (६९) भूषविणार आहेत. सू की यांनी गुरुवारी यॉ यांचे नाव अध्यक्षपदासाठी जाहीर केले. आपल्या विश्वासू व्यक्तीच्या माध्यमातून त्यांना देशाचा कारभार करायचा आहे. यॉ यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होण्यास काही दिवस लागतील. सू की यांच्या पक्षाला बहुमत असल्यामुळे यॉ निवडून येण्यात अडचण
नाही.
म्यानमारची घटना लष्कराने लिहिली असून देशाचे सर्वोच्च पद ज्याचे जवळचे नातेवाईक विदेशी आहेत त्याला भूषविता येत नाही, अशी तरतूद तीत आहे. सू की यांचे दिवंगत पती आणि दोन मुले ही ब्रिटिश आहेत.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी) पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आहे.

Web Title: Suu Kyi will be the driver of Myanmar's chair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.