Sri Lanka crisis: माजी पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 06:41 PM2018-10-29T18:41:02+5:302018-10-29T18:41:59+5:30

माजी पेट्रोलियम मंत्री आणि रानिल विक्रमसिंघे यांचे सहकारी अर्जुन रणतुंगा यांच्या सुरक्षा रक्षकाने गोळीबार केल्याप्रकरणी त्यांना सोमवारी अटक करण्यात आली आहे.

Sri Lankan Petroleum Minister Arjuna Ranatunga arrested after his guards opened fire on protestors | Sri Lanka crisis: माजी पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक 

Sri Lanka crisis: माजी पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक 

googlenewsNext

कोलंबो : श्रीलंकेत मोठे राजकीय संकट ओढावले आहे. रानिल विक्रमसिंघे यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यात आल्यानंतर श्रीलंकेतील राजकीय वातावरण तापले आहे. तसेच काही हिंसक घटना घडल्या आहेत.

माजी पेट्रोलियम मंत्री आणि रानिल विक्रमसिंघे यांचे सहकारी अर्जुन रणतुंगा यांच्या सुरक्षा रक्षकाने गोळीबार केल्याप्रकरणी त्यांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. रविवारी (दि.28) अर्जुन रणतुंगा आपल्या कार्यालयाकडे जात असताना त्यांची गाडी आंदोलकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या सुरक्षा रक्षकाने आंदोलकांवर गोळीबार केला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, कोलंबो क्राइम विभागाने सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबार प्रकरणी माजी पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक केली असून याप्रकरणी त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे, असे पोलीस प्रवक्ते रुवान गुनासेखरा यांनी सांगितले. 

गेल्या शुक्रवारी राष्ट्रपती मैत्रीपाला श्रीसेना यांनी राजपक्षे यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली होती. मात्र संसदेच्या अध्यक्षांनी रानिल विक्रमसिंघे यांना पुन्हा पंतप्रधान म्हणून मान्यता दिली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी रानिल विक्रमसिंघे यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांची भेट घेत संसदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. आपल्याकडे बहुमत असल्याचाही दावाही विक्रमसिंघे यांनी केला होता. असे असूनही राष्ट्रपतींनी शनिवारी संसदेला 19 नोव्हेंबरपर्यंत संस्थगित ठेवले आहे. नवीन पंतप्रधान महिंद्रा राजपाक्षे यांना संसदेत बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा, या उद्देशाने राष्ट्रपतींनी हा निर्णय घेतला. दुसरीकडे मी अजूनही देशाचा पंतप्रधान आहे, असा दावा विक्रमसिंघे यांनी केला होता.

Web Title: Sri Lankan Petroleum Minister Arjuna Ranatunga arrested after his guards opened fire on protestors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.