पाकिस्तानी खेळाडूचं लाजिरवाणं कृत्य, महिला खेळाडूच्या पर्समधून चोरले पैसे, त्यानंतर... 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 02:00 PM2024-03-05T14:00:14+5:302024-03-05T14:00:43+5:30

Pakistan News: गेल्या काही काळापासून पाकिस्तान हा दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर आहे. गरिबी, दहशतवाद आणि भ्रष्टाचार यामुळे या देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर वारंवार लाजिरवाणं व्हावं लागतंय.

Shameful act of Pakistani player, money stolen from female player's purse, then... | पाकिस्तानी खेळाडूचं लाजिरवाणं कृत्य, महिला खेळाडूच्या पर्समधून चोरले पैसे, त्यानंतर... 

पाकिस्तानी खेळाडूचं लाजिरवाणं कृत्य, महिला खेळाडूच्या पर्समधून चोरले पैसे, त्यानंतर... 

गेल्या काही काळापासून पाकिस्तान हा दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर आहे. गरिबी, दहशतवाद आणि भ्रष्टाचार यामुळे या देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर वारंवार लाजिरवाणं व्हावं लागतंय. त्यात परदेशात पाकिस्तानी नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या काही कृत्यामुळे पाकिस्तानची मान मान शरमेने खाली जात असते. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानच्या एका खेळाडूने परदेश दौऱ्यावर असताना एका महिला खेळाडूच्या पर्समधील पैसे चोरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

एका पाकिस्तानी बॉक्सरने इटलीमध्ये गेले असताना लाजीरवाणं कृत्य केलं. जोहेब रशिद असं या बॉक्सरचं नाव आहे. तो इलटीमध्ये ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत खेळण्यासाठी ५ सदस्यीय पाकिस्तानी संघासोबत गेला होता. यादरम्यान, जोहेब याने सहकारी महिला खेळाडू लौरा इकराम हिच्या पर्समधून पैसे चोरले आणि तो फरार झाला.

पाकिस्तानच्या हौशी बॉक्सिंग संघटनेने याबाबतची माहिती आज दिली आहे. तसेच संघटनेने या घटनेची माहिती इटलीमधील पाकिस्तानच्या दूतावासाला दिली आहे. तसेच पोलिसांकडेही तक्रार देण्यात आली आहे. अशी माहिती पाकिस्तानच्या बॉक्सिंग संघटनेच्या अधिकाऱ्याने दिली. 

पाकिस्तानी खेळाडूने परदेशात असं कृत्य करण्याची ही पहिलीच घटना नाही आहे. याआघीडी काही पाकिस्तानी खेळाडून परदेशात संघाची साथ सोडून गायब झाले आहेत.  परदेशातील उत्तम भविष्याच्या आशेने संघासोबत गेलेले पाकिस्तानी खेळाडू पुन्हा मायदेशी परतू इच्छित नाहीत.  

Web Title: Shameful act of Pakistani player, money stolen from female player's purse, then...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.