टाईम मॅगझीनची पुन्हा विक्री; सॉफ्टवेअर कंपनी 1,368 कोटींना विकत घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 03:40 PM2018-09-17T15:40:34+5:302018-09-17T15:41:44+5:30

Re-sale of Time magazine; The software company will buy 1,368 crores | टाईम मॅगझीनची पुन्हा विक्री; सॉफ्टवेअर कंपनी 1,368 कोटींना विकत घेणार

टाईम मॅगझीनची पुन्हा विक्री; सॉफ्टवेअर कंपनी 1,368 कोटींना विकत घेणार

Next

वॉशिंग्टन : जगप्रसिद्ध मॅगझीन टाईमला अमेरिकेची सॉफ्टवेअर कंपनी सेल्सफोर्सच्या सह-संस्थापकाने विकत घेतले आहे. हा व्यवहार 1386 कोटींना ठरला असून पुढील 30 दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. 


टाईम मॅगझीनचा जगभरात प्रचंड खप आहे. 1923 मध्ये हेन्री लूस यांनी हे मॅगझीन सुरु केले होते. टाईम मॅगझीनला जानेवारी 2018 मध्ये मेरेडिथ ग्रुपने खरेदी केले होते. मात्र, मेरेडिथने हे मॅगझीन सेल्सफोर्सचे सह-संस्थापक  मार्क बेनिओफ (53) आणि त्यांची पत्नी लायनी बेनिओफ यांनी विकत घेतली आहे. बेनिओफ यांची एकूण संपत्ती 6.7 अब्ज डॉलर एवढी आहे. 



 

Web Title: Re-sale of Time magazine; The software company will buy 1,368 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.