पाकिस्तान चिनी कर्जाच्या विळख्यात

By admin | Published: October 18, 2016 07:22 PM2016-10-18T19:22:02+5:302016-10-18T19:22:02+5:30

गेल्या काही वर्षांपासून चीनने पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे पाकिस्तान चिनी कर्जाच्या ओझे झाले आहे.

Pakistan's noted Chinese loan | पाकिस्तान चिनी कर्जाच्या विळख्यात

पाकिस्तान चिनी कर्जाच्या विळख्यात

Next
>ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि 18 - पाकिस्तानची अर्थव्यवस्था उधार उसनवारीवर चालते हे सर्वश्रुत आहे. गेल्या काही वर्षांपासून चीनने पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे पाकिस्तान  चिनी कर्जाच्या ओझे झाले आहे. आता चीनसारख्या देशाकडून पाकिस्तानमध्ये होत असलेल्या मोठ्या आर्थिक गुंतवणुकीमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईस येईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ)दिला आहे. 
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने  चीन आणि पाकिस्तान यांच्यात बनत असलेल्या आर्थिक क्षेत्रामुळे पाकिस्तानला पडणाऱ्या प्रभावाबाबत मूल्यांकन केले आहे. त्यानुसार सुरुवातीच्या काळात पाकिस्तानमधील एफडीआय आणि एक्स्टर्नल फंड वाढेल. मात्र त्याबरोबरच पाकिस्तावच्या चालू खात्यातील तूटही वाढत जाण्याची शक्यता आयएमएफने व्यक्त केली आहे. 
चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्रातील व्यापार 2020 पर्यंत 11 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. हा व्यापार जवळपास 5.7 अब्ज डॉलरच्या बरोबरीचा असेल.  तसेच पाकिस्तानचे चीनवरील अवलंबित्व वाढत जाणार असून, त्यांच्या गरजा 60 टक्क्यांपर्यंत वाढणार आहेत. चीनच्या गुंतवणुकीतून सुरुवातीला पाकिस्तानमध्ये 27.8 अब्ज डॉलर रुपये येतील, तर उर्वरित रक्कम 2030 पर्यंत गुंतवली जाईल.  मात्र चिनी कंपन्यांनी गुंतवणुकीचा फायदा उठवण्यास सुरुवात केल्यावर पाकिस्तानमधील पैसा वेगाने बाहेर जाऊ लागेल. 
2021 पर्यंत पाकिस्तानवरील चिनी कर्जामध्ये बेसुमार वाढ होईल, त्यामुळे पाकिस्तानचा जीडीपी 0.4 टक्के होईल. जी पाकिस्तानसाठी चिंतेची बाब ठरेल, असा इशाराही नाणेनिधीने दिला आहे.  
 

Web Title: Pakistan's noted Chinese loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.