केवळ मेहूल चोकसी नव्हे; तर 28 भारतीयांनी घेतले अँटिग्वाचे नागरिकत्व?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 12:00 PM2018-07-27T12:00:01+5:302018-07-27T12:00:09+5:30

अँटिग्वाने आपल्या देशात गुंतवणूक वाढावी यासाठी सिटीझनशिप बाय इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम अशी योजना सुरु केली आहे. अँटिग्वाला मदत करा, गुंतवणूक करा आणि दुहेरी नागरिकत्व मिळवा अशी ती योजना आहे.

Not only Mehul Choksi; 28 Indians may have accepted citizenship of Antigua | केवळ मेहूल चोकसी नव्हे; तर 28 भारतीयांनी घेतले अँटिग्वाचे नागरिकत्व?

केवळ मेहूल चोकसी नव्हे; तर 28 भारतीयांनी घेतले अँटिग्वाचे नागरिकत्व?

googlenewsNext

नवी दिल्ली- पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहूल चोकसी कॅरेबियन बेटांमधील एखाद्या लहानशा देशांमध्ये आश्रय घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यात आता अँटिग्वामध्ये भारताच्या 28 लोकांनी नागरिकत्व मिळवले असण्याची शक्यता नव्या माहितीमधून उघड होत आहे. 2014 पासून काही भारतीयांना अँटिग्वाने नागरिकत्व दिले असा आरोप होत असून आता विरोधकांनी अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असा आग्रह धरला आहे.

केवळ 2 लाख डॉलर भरणाऱ्या यापैकी 7 नागरिकांना 1 जानेवारी 2017 ते 30 जून 2017 या काळात नागरिकत्व मिळाले आहे. अँटिग्वाने आपल्या देशात गुंतवणूक वाढावी यासाठी सिटीझनशिप बाय इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम अशी योजना सुरु केली आहे. अँटिग्वाला मदत करा, गुंतवणूक करा आणि दुहेरी नागरिकत्व मिळवा अशी ती योजना आहे. एकूण 1121 परदेशी लोकांनी येथील नागरिकत्व मिळवले असून त्यामध्ये 2.5 टक्के भारतीय आहेत. या सर्व लोकांमध्ये चीनी नागरिकांची सर्वात जास्त संख्या आहे. 2014 पासून कॅरेबियन देशांमध्ये 478 चीनी नागरिकांनी नागरिकत्व घेतले आहे. तसेच त्यात 42 बांगलादेशी व 25 पाकिस्तानी लोकांचा समावेश आहे.

अँटिग्वा आणि बार्बाडोस नागरिकत्वासाठी गंतवणूक योजना 2012 साली जाहीर झाली. यानुसार ज्या व्यक्तीला त्या देशाचे नागरिकत्व आहे ते काही रक्कम रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवू शकतात किंवा निधी देऊ शकतात. त्यासाठी  पर्याय देण्यात आले आहेत. अँटिग्वा विकास निधीला 2 लाख डॉलर्स देणे, तेथील रिअल इस्टेटमध्ये 4 लाख डॉलर्स गुंतवणे किंवा तेथील व्यवसायात 15 लाख डॉलर्स गुंतवणे असे कोणेही पर्याय वापरता येऊ शकतात. मेहुल चोक्सीच्या आर्थिक ताकदीच्या मानाने हे सर्व आकडे किरकोळ म्हणावे लागतील. या पासपोर्टबरोबर 132 देशांमध्ये व्हीसाविना प्रवास करण्याची सुविधाही त्याला मिळणार आहे. असे असले तरी अँटिग्वाच्या नागरिकत्वासंबंधी संकेतस्तळावर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना नागरिकत्व मिळणार नाही असे नमूद करण्यात आले आहे. मात्र आजवर अनेक घोटाळेबाजांनी अशा प्रकारचे मार्ग वापरुन लहान देशांमध्ये नागरिकत्व मिळवून चैनीत जगण्याचा मार्ग अवलबंला आहे. पीएनबी घोटाळ्यात बँकेची व पर्यायाने भारत देशाची फसवणूक करणाऱ्या मेहुलला अँटिग्वासारखे देश स्वर्गच आहेत.

सेंट किट्स आणि नेवीसचा पायपोर्टही सहज मिळू शकतो. 1.3 कोटी रुपये दिले की या देशाचा पासपोर्ट केवळ चार महिन्यांमध्ये हातात पडतो. हे पैसे सेंट किट्स शाश्वत विकास निधीमध्ये द्यायचे किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवायचे की पासपोर्ट मिळतो. तसेच यामुळे जगभरातील 141 देशांमध्ये व्हीसाविना जाताही येतं. यामध्ये भारत आणि इंग्लंड देशांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर डॉमिनिका रिपब्लिकमध्ये 68 लाख रुपयांचा निधी दिला की तुम्ही प्रत्यक्षात तेथे न जाता पासपोर्ट मिळतो. त्याबरोबर तुम्हाला जगातील 115 देशांमध्ये व्हीसाविना फिरता येऊ शकतं. त्यामध्ये युरोपियन युनीयमधील देश, हाँगकाँग, सिंगापूर, स्वित्झर्लंड या देशांचा समावेश आहे.

Web Title: Not only Mehul Choksi; 28 Indians may have accepted citizenship of Antigua

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.