केवळ भारतानेच नव्हे, तर अनेक देशांनी केला होता नोटाबंदीचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 10:17 AM2017-11-07T10:17:57+5:302017-11-07T10:21:00+5:30

भारतामध्ये नोटाबंदीचा प्रयोग करुन उद्या 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. पण नोटाबंदीचा असा निर्णय घेणारा भारत हा काही एकमेव देश नाही. जगातील अनेक देशांनी यापुर्वी असा निर्णय घेतलेला आहे.

Not only India, but many countries have tried Demonetization | केवळ भारतानेच नव्हे, तर अनेक देशांनी केला होता नोटाबंदीचा प्रयोग

केवळ भारतानेच नव्हे, तर अनेक देशांनी केला होता नोटाबंदीचा प्रयोग

Next
ठळक मुद्देऑस्ट्रेलियाने प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता.पाकिस्तानने नव्या रुपातील नोटा चलनात आणण्यापुर्वी, जुन्या नोटा बदलण्यास दिड वर्षांचा अवधी लोकांना दिला होता.

मुंबई- भारतामध्ये नोटाबंदीचा प्रयोग करुन उद्या 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. पण नोटाबंदीचा असा निर्णय घेणारा भारत हा काही एकमेव देश नाही. जगातील अनेक देशांनी यापुर्वी असा निर्णय घेतलेला आहे.

1)झिम्बाब्वे- 100,000,000,000,000 हा आकडा तुम्ही वाचू शकता का? हा आकडा आहे 1 ट्रीलियन डॉलरचा. झिम्बाब्वेच्या बेसुमार चलनवाढीमध्ये एवढ्या मोठ्या रकमेची नोट झिम्बाब्वेला चलनात आणावी लागली होती. प्रमाणाबाहेर आयात आणि आयातीसाठी लागणारे पैसे यामुळे संपुर्ण देशाची स्थिती गेल्या काही वर्षांमध्ये बिघडून गेली होती. शेवटी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर या ट्रीलियन डॉलरची किंमत अर्ध्या डॉलरपेक्षाही कमी झाली. दिशाहीन नेतृत्त्व, भयंकर चलनवाढ, बेरोजगारांची वाढलेली संख्या, महागाई अशा एका मागोमाग संकटांनी घेरलेल्या झिम्बाब्वेला अजून काही वर्षे या संकटातून बाहेर पडता येईल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. अतिरेकी चलनवाढीमुळे साधा पाव किंवा अंडी, दूध घ्यायलाही काही हजार डॉलर मोडण्याची वेळ नागरिकांवर आली होती. अमेरिकी डॉलर किंवा सुटे झिम्बाब्वेयिन डॉलर देण्यासाठी लोकांनी रस्त्यावर फेरीवाल्यांसारखे नोटांची एक्स्चेंज सेंटर्स सुरु केली. हातगाडी किंवा सिमेंटची पोती नेण्यासाठी वापरायच्या गाड्यांमधून नोटांची ने-आण लोक करु लागले होते.

2) नायजेरिया- नायजेरीया हा सुद्धा देश झिम्बाब्वेसारखा नाजूक आर्थिक स्थितीमध्ये राहणारा आहे. गेल्या अनेक वर्षांपर्यंत नायजेरीयाचे अर्थकारण पेट्रोलच्या निर्यातीवर अवलंबून होते. उत्पादन क्षेत्रावर भर न दिल्यामुळे बहुतांश गोष्टी झिम्बाब्वेप्रमाणेच आयात केल्या जात असत. त्यातच 1984 साली राष्ट्राध्यक्ष महंमद बुहारी यांनी जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र महागाई आणि कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या देशाला हा निर्णय पेलवला नाही आणि त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती आणखीच बिघडली. बुहारी आता बऱ्याच वर्षांच्या काळानंतर नायजेरियाच्या राजकारणात पुन्हा स्थान मिळवून राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. नायजेरियाच्या चलनाला नायरा असे म्हणतात.

3) घाना- करबुडव्यांना रोखण्यासाठी घानाने त्यांची 50 सेडिस (चलन) नोट रद्दबातल केली. पण याचा कोणताही सकारात्मक फायदा त्यांना झाला. लोकांनी रोख पैसे साठवण्याऐवजी थेट स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.

4)उत्तर कोरिया- हुकुमशाही आणि अर्थव्यवस्थेत घेतले जाणारे दिशाहिन निर्णय हे एक जुनं नातं आहे. उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग यांनी 2010 साली अचानक नोटाबंदीचा निर्णय घेतला . काळ्या पैशाची अर्थव्यवस्था कोसळावी यासाठी घेतलेला हा निर्णय लोकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारा ठरला. कित्येक लोकांवर उपाशी झोपण्याची वेळ या निर्णयामुळे आली होती.

5) सोव्हिएट युनियन- पुर्वीच्या (संयुक्त) रशियन संघराज्यामध्ये मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी मोठ्या रकमेचे रुबल (चलन) रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पण यामुळे जनतेत असंतोष इतका माजला की शेवटी उठावाचा प्रयत्नही तेव्हा करण्यात आला. मात्र त्यावर लष्कराचे बळ वापरून तो मोडण्यात आला.

6) ऑस्ट्रेलिया- ऑस्ट्रेलियानेही आपल्या देशातील चलन बदलण्यासाठी नोटाबंदीचा वापर केला होता. ऑस्ट्रेलियाने कागदाऐवजी पॉलिमर (प्लास्टिक)च्या नोटा वापरण्यासाठी जुन्या नोटा रद्द केल्या. केवळ हा मर्यादित उद्देश असल्यामुळे त्याचे कोणतेही नकारात्मक परिणाम ऑस्ट्रेलियात दिसून आले नाहीत.

7) म्यानमार- म्यानमारने 1987 साली चलनातील 80 टक्के नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. लष्कराच्या ताब्यात असलेल्या एकाधिकारशाही सत्तेने घेतलेल्या या निर्णयामुळे म्यानमारमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. लोकांच्या असंतोषालाही दडपून टाकून हा निर्णय राबवण्यात आला.

8) पाकिस्तान- मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये पाकिस्तानने जुन्या नोटा बदलून नव्या रुपातील नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेतला. मात्र तो निर्णय अंमलात आणण्यापुर्वी दिड वर्ष लोकांना नोटा बदलण्याची संधी मिळाली होती. अशा प्रकारे भरपूर वेळ मिळाल्याने लोकांना कमीत कमी त्रास होऊन, नव्या नोटा मिळवता आल्या.

Web Title: Not only India, but many countries have tried Demonetization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.