हद्द झाली... 80 विवाहित पुरुषांसोबत संबंध ठेवल्याचा 'तिला' अभिमान वाटतो!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 08:45 PM2018-02-28T20:45:57+5:302018-02-28T20:45:57+5:30

ती सध्या विवाहित जोडपे आणि प्रेमी युगुलांना ‘सेक्स’ या विषयावर मार्गदर्शन करते.

Mother-of-two says she’s had 80 affairs with married men and she’s proud | हद्द झाली... 80 विवाहित पुरुषांसोबत संबंध ठेवल्याचा 'तिला' अभिमान वाटतो!

हद्द झाली... 80 विवाहित पुरुषांसोबत संबंध ठेवल्याचा 'तिला' अभिमान वाटतो!

googlenewsNext

नवी दिल्ली - पतीच्या मृत्यूनंतर 80 विवाहित पुरषांसोबत संबध होते आणि मला याचा अभिमान आहे असा धक्कादायक खुलासा एका महिलेनं केला आहे. लुईस वेल्दे असे त्या महिलेचं नाव आहे. दोन मुलांची आई असणारी लुईस वेल्दे व्यवसायानं सेक्स थेरपिस्ट आहे. वैवाहिक नात्यात शारीरिक सुखाची कमतरता निर्माण झाली की नातं संपुष्टात येते मग अशा वेळी पुरुष विवाहबाह्य संबध ठेवतात असं लुईस वेल्देचे मत आहे. 

43 वर्षीय लुईस वेल्दे समुपदेशक आहे. विवाहित जोडपे आणि प्रेमी युगुलांना ती ‘सेक्स’ या विषयावर मार्गदर्शन करते. नुकतीच तिने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली यात तिनं विवाहबाह्य संबंधांवर खुलेपणानं भाष्य केलं. वैवाहिक जीवनात शारीरिक सुखाची कमतरता भासू लागली की नात्यात कटुता येऊ लागते. मग अशावेळी आपल्या जोडीदाराला फसवण्याचे प्रकार घडतात असंही ती म्हणाली. याच मुलाखतीत आपले एक दोन नाही तर 80 जणांशी विवाहबाह्य संबंध असल्याचा खुलासाही तिनं केला.

2004मध्ये पतीचे निधन झालं तेव्हा लुईस वेल्दे 34 वर्षाची होते. पतीसोबत आधीपासून तिचे खटके उडत होते, त्यामुळं घटस्फोट घेण्यापूर्वीच आपण विवाहबाह्य संबध ठेवण्यास सुरुवात केली असल्याचे तीने मुलाखतीत सांगितले. माझे ज्या पुरुषासोबत संबध आले त्यांच्या पत्नीना ही गोष्ट माहित असल्याचा खुलासाही यावेळी तिने केला. 

60 टक्के लोक शारीरिक सुखासाठी आपल्या जोडीदाराची फसवणूक करतात. पण त्यांनी जर खुलेपणानं सेक्स या विषयावर चर्चा केली अन् हा विषय समजून घेतला तर नात्यात भांडणं कमी होतील असंही निरिक्षण तिने नोंदवलं आहे.

Web Title: Mother-of-two says she’s had 80 affairs with married men and she’s proud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.