कुत्र्याने तोडला होता मॉडलच्या ओठाचा लचका, सर्जरीसाठी ३ कोटी रूपये केला खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 05:13 PM2021-11-26T17:13:17+5:302021-11-26T17:17:34+5:30

कुत्र्याने केलेल्या कारनाम्यामुळे मला जाहिरातीला नकार द्यावा लागला. त्यासोबतच ब्रुकलिनला असं वाटलं होतं की, जणू तिचं करिअरच संपलं आहे.

Model mouth savaged dog attack surgery smile | कुत्र्याने तोडला होता मॉडलच्या ओठाचा लचका, सर्जरीसाठी ३ कोटी रूपये केला खर्च

कुत्र्याने तोडला होता मॉडलच्या ओठाचा लचका, सर्जरीसाठी ३ कोटी रूपये केला खर्च

Next

कुत्र्याच्या हल्ल्यात शिकार झालेली कॅलिफोर्नियातील (California) एका मॉडलने साधारण ३ कोटी रूपये खर्च करून आपल्या ओठांची सर्जरी केली आहे. नातेवाईकांच्या पाळीव पिट बूल कुत्र्याने २२ वर्षीय ब्रुकलिन खौरी नावाच्या मॉडलच्या वरच्या ओठाचा लचका तोडला होता.

मॉडल ब्रुकलिनने सांगितलं की, ही घटना गेल्यावर्षी ३ नोव्हेंबरला घडली होती. ती कुत्र्यासोबत खेळत होती, त्याचे लाड करत होती. जसा तिने कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवला त्याने लगेच तिच्यावर हल्ला केला. मॉडलने सांगितलं की, त्या दिवशी तिला तिच्या करिअरची पहिली टीव्ही जाहिरात शूट करायची होती. 

पण कुत्र्याने केलेल्या कारनाम्यामुळे मला जाहिरातीला नकार द्यावा लागला. त्यासोबतच ब्रुकलिनला असं वाटलं होतं की, जणू तिचं करिअरच संपलं आहे. कारण कुत्र्याच्या हल्ल्यात तिचं आणि ओठ पूर्णपणे खराब झालं होतं.

मात्र, ब्रुकलिनने हार मानली नाही. तिने ओठ आणि नाकाची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती तिने तिच्या यूट्यूब चॅनलवर दिली. तिने सांगितलं की, ती काही दिवसांपर्यंत या सर्जरीच्या प्रक्रियेतून गेली.

ब्रुकलिन म्हणाली की, 'मी पुन्हा ठीक होण्यासाठी तयार आहे. मला आशा आहे की,  या सर्जरीनंतर मला माझी आधीची स्माइल परत मिळेल. पण या जखमेमुळे माझ्या करिअऱला जो ब्रेक लागलाय त्याने मी दु:खी आहे'.

१७ नोव्हेंबरला सर्जरी केल्यानंतर ती म्हणाली की, 'मी माझं तोंड जराही हलवू शकत नाहीये. त्यामुळे मला नाकाच्या वर एक फिडींग ट्यूब ठेवावी लागत आहे. मला लिक्विड डाएटवर रहावं लागत आहे. इतकंच काय तर सर्जरीनंतर काही दिवस मला हॉस्पिटलमध्येच रहावं लागणार आहे. माझ्यासाठी हा एक कठीण काळ आहे'.
 

Web Title: Model mouth savaged dog attack surgery smile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.