फ्रिजरमध्ये लपलेला माणूस चाकूहल्ला करतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 11:34 AM2018-08-07T11:34:26+5:302018-08-07T11:38:06+5:30

ही व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर होती असे पोलिसांचे म्हणणे आहे. रेस्टोरंटमधील कर्मचारी फ्रिजरजवळ गेले असता त्याने कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला केला

man enters in freezer in new york | फ्रिजरमध्ये लपलेला माणूस चाकूहल्ला करतो तेव्हा...

फ्रिजरमध्ये लपलेला माणूस चाकूहल्ला करतो तेव्हा...

Next

न्यू याॅर्क- अमेरिकेत मॅनहॅटनमधील एका रेस्टोरंटमध्ये विचित्र घटना घडली आहे. रेस्टोरंटच्या वॉक इन फ्रिजरमध्ये लपलेल्या व्यक्तीने चाकूहल्ला करुन खळबळ माजवली आहे. अंदाजे ५४ वर्षे वयाचा हा पुरुष सर्वांची नजर चुकवून फ्रिजरमध्ये गेला होता.

ही व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर होती असे पोलिसांचे म्हणणे आहे. रेस्टोरंटमधील कर्मचारी फ्रिजरजवळ गेले असता त्याने कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर रेस्टोरंटच्या स्वयंपाकगृहात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू केवळ वैद्यकीय कारणांमुळेच झाला असून त्यामागे दुसरे कोणतेही कारण नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. हा माणूस अॅरिझोना प्रांतातील होता इतकेच सध्या स्पष्ट झाले असून त्याचे कुटुंबीय येईपर्यंत अधिक माहिती जाहीर करता येणार नाही असे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र दुसऱ्याच दिवशी तो खुनी असल्याची माहिती समोर आली. त्याच्यावर दोन व्यक्तींची हत्या केल्याचा आरोप होता. गेल्याच आठवड्यात त्याची जामिनावर सूटका झाली होती.

सकाळी ११ वाजता जेवणाच्यावेळेस कर्मचाऱ्यांनी वॉक इन फ्रिजर उघडल्यावर हा माणूस आत पडलेला दिसला. तत्पुर्वी तीन तास रेस्टोरंट सुरु होते. त्यामुळे तो कधी आला, सर्वांची नजर चुकवून फ्रीजमध्ये कसा गेला हे कोणालाच समजले नाही. फ्रीजर उघडताच हातातील चाकू घेऊन तो माणूस कर्मचार्यांच्या अंगावर 'सॅटन अवे' (दूर हो सैताना) असे ओरडत आला. मात्र त्याच्या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही. त्याच्याकडील चाकू काढून घेऊन कर्मचार्यांनी त्याला जमिनीवर झोपवले. पोलीस घटनास्थळी येताच तो कोणत्याही प्रकारे हालचाल करत नव्हता किंवा प्रतिसाद देत नव्हता. रुग्णालयात दाखल केल्यावर त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

Web Title: man enters in freezer in new york

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.