विद्यार्थिनीच्या मुलाला कडेवर घेत 'या' प्राध्यापकाने दिलं लेक्चर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 10:24 PM2017-09-15T22:24:45+5:302017-09-15T23:30:18+5:30

टेक्सासमधील 'ए अँड एम' विद्यापीठात प्राध्यापक डॉ. हेन्री मुसोमा हे शिकवतात. सोशल मीडियावर त्यांचा फोटो सध्या व्हायरल होत असून त्यांनी कडेवर घेतलेल्या मुलामुळे त्यांचा फोटो व्हायरल होत आहे.

Lecture given by Professor 'lecturer' on the student's hand | विद्यार्थिनीच्या मुलाला कडेवर घेत 'या' प्राध्यापकाने दिलं लेक्चर

विद्यार्थिनीच्या मुलाला कडेवर घेत 'या' प्राध्यापकाने दिलं लेक्चर

Next

टेक्सास, दि. 15 : टेक्सासमधील 'ए अँड एम' विद्यापीठात प्राध्यापक डॉ. हेन्री मुसोमा हे शिकवतात. सोशल मीडियावर त्यांचा फोटो सध्या व्हायरल होत असून त्यांनी कडेवर घेतलेल्या मुलामुळे त्यांचा फोटो व्हायरल होत आहे. त्यांच्या अॅस्टन रॉबिनसन या विद्यार्थिनीचे हे काही महिन्यांचे मुले असून तिच्यासाठी आपल्या छोट्या बाळाला सांभाळत इतर काम करणे फार मुश्कील होते. आपल्या विद्यार्थिनीचा अभ्यास बुडू नये या काळजीपोटी माणुसकी दाखवत त्यांनी तिच्या चिमुकल्याला कडेवर घेत विद्यार्थांना शिकवले.

तिने कॉलेजला न जाण्याचा निर्णय आपल्या बाळाला सांभाळायला कोणी मिळत नाही म्हणून घेतला आणि ईमेल करून प्राध्यापकांना तसे कळवले. दुसरे कोणी असते तर त्याकडे दुर्लक्ष केले असते किंवा या सबबी नेहमीच्या आहेत, असे म्हणत दुर्लक्ष केले असते. पण प्राध्यापक हेन्रींनी माणुसकी दाखवत तिला बाळाला घेऊन कॉलेजला येण्यास सांगितले आणि बाळाला डेवर उचलून घेत हेन्रीनीं विद्यार्थ्यांना शिकवले.

माणूसकी आणि शिक्षणाचं महत्त्व जाणणारा प्राध्यापक मी कुठेच पाहिला नाही. मुलाला सांभाळून शिक्षण घेणं खूप अवघड काम आहे. पण या जगात हेन्रीसारखे प्राध्यापक आहेत आणि त्यांच्यामुळे मी शिकू शकते याचचं मला समाधान आणि आनंद आहे, अशी प्रतिक्रिया अ‍ॅस्टनने दिलीय.

 

Web Title: Lecture given by Professor 'lecturer' on the student's hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.