ठळक मुद्देमहायुद्धाच्या काळानंतर ऑस्कर शिंडलर आणि त्याची पत्नी एमिली 1949 साली अर्जेंटिनातील ब्युनॉस आयर्स येथे पळून गेले. तेथे गेल्यावर पोलंडमध्ये त्याने ज्या ज्यू लोकांना आपल्या कारखान्यात काम करण्याची संधी देऊन वाचवले होते, त्या ज्यूंची त्याला कृतज्ञता व्यक्त कर

जेरुसलेम- जर्मन उद्योजक आणि शेकडो ज्यूंना नाझींच्या तावडीतून वाचवणाऱ्या ऑस्कर शिंडलरला लिहिलेल्या पत्रांचा लिलाव होणार आहे. ही पत्रे त्याने ज्या ज्यूंना वाचवले त्या लोकांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लिहिली होती. 8 डिसेंबर रोजी लॉरेन्स ऑक्शनियर्स हा लिलाव करणार आहे. 

महायुद्धाच्या काळानंतर ऑस्कर शिंडलर आणि त्याची पत्नी एमिली 1949 साली अर्जेंटिनातील ब्युनॉस आयर्स येथे पळून गेले. तेथे गेल्यावर पोलंडमध्ये त्याने ज्या ज्यू लोकांना आपल्या कारखान्यात काम करण्याची संधी देऊन वाचवले होते, त्या ज्यूंची त्याला कृतज्ञता व्यक्त करणारी पत्रे येऊ लागली. शिंडलरने नाझी फौजांना लाच देऊन तसेच हे कामगार लष्करी साहित्य तयार करण्यासाठी आवश्यक आहेत असे दाखवून त्यांना वाचवले होते. 1200 ज्यूंचे प्राण वाचविण्यासाठी त्यांच्या औषधांच्या खर्चासाठी एमिली शिंडलरने स्वतःचे दागिने आणि कपडेही विकले होते. त्यांच्या या कामगिरीवर स्टीव्हन स्पिलबर्गने "शिंडलर्स लिस्ट" हा चित्रपटही बनवला होता. त्याला ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता. 28 एप्रिल 1908 रोजी जन्मलेला ऑस्कर शिंडलर हा जर्मन उद्योजक होता, महायुद्धाच्या काळामध्ये त्याने ज्यूंचे प्राण वाचवले होते. 9 ऑक्टोबर 1974 रोजी त्याचे पश्चिम जर्मनीमध्ये निधन झाले.  एमिली शिंडलर यांचा 2001 साली बर्लिनमध्ये वयाच्या 93व्या वर्षी मृत्यू झाला.

''मी जरी तुला प्रत्यक्षात भेटले नाही तरी तू मला मृत्युच्या तावडीतून वाचवणे हे एखाद्या विशेषाधिकार आणि सन्मानापेक्षा आजिबात कमी नव्हतं, तुला वाढदिवसाच्या आणि आरोग्यदायी आय़ुष्यासाठी शुभेच्छा असा एका पत्रातील मजकूर जेली मेल वर्तमानपत्राने प्रसिद्ध केला आहे." यावरुन शिंडलरवर हे ज्यू किती प्रेम करत असावेत हे जाणवते.
''माझे मन तुझ्या धाडसी त्यागामुळे हेलावले होते. माझा माणुसकीवरचा विश्वास पुन्हा प्रस्तापित करण्यासाठी तू केलेल्या प्रयत्नांबद्दल तुझे आभार'', असेही एका पत्रात लिहिले आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.