हमासच्या तावडीतून सुटला; बापाला पाहताच घट्ट मिठी मारली, व्हिडिओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 03:13 PM2023-11-26T15:13:41+5:302023-11-26T15:14:57+5:30
आई,आजी-आजोबासह हमासच्या कैदेत असलेला नऊ वर्षीय मुलगा 50 दिवसानंतर मायदेशात परतला.
Israel-Hamas War: गेल्या महिनाभरापासून हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान एक सुखद क्षण पाहायला मिळाला. अखेर तो दिवस आला, ज्याची अनेक लोक आतुरतेने वाट पाहत होते. इस्रायल-हमास यांच्यात चार दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा झाली आणि दोन्ही बाजुंच्या कैद्यांची सुटका सुरू झाली. या कैद्यांमध्ये इस्रायलच्या 9 वर्षीय मुलाचाही समावेश आहे.
ओहड मुंडेर, असे या इस्रायली मुलाचे नाव आहे. हल्ल्यादरम्यान हमासच्या दहशतवाद्यांनी ओहड मुंडेरसह त्याची आई आणि आजीलाही किडनॅप केले होते. 50 दिवस हमासच्या बंदिवासात घालवल्यानंतर त्याची सुटका झाली. ओहड आपल्या घरी परत येईल, अशी आशाही त्याच्या वडिलांनी सोडली होती. पण, आज अखेर त्याची सुटका झाली.
Ohad Munder, his mother Keren, and grandmother Ruti in the first moments of reuniting with Ohad's father, brother, and other family members❤️
— Aviva Klompas (@AvivaKlompas) November 25, 2023
It's hard to see through all these tears. pic.twitter.com/cgfY8Dm3gF
ओहड मुंडेरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात तो आपल्या वडिलांना पाहताच घट्ट मिठी मारताना दिसतोय. मुलाला पाहताच वडील आनंदाने उडी मारतात. हा आनंदाचा क्षण कदाचित शब्दात व्यक्त करता येणार नाही. यावेळी त्याचा चुलत भाऊही त्याला मिठी मारतो. ओहडसोबत त्याची आई कॅरेन आणि आजी रुथ यांनाही सोडण्यात आले. व्हिडिओमध्ये आई आणि आजीही दिसत आहेत. पण, ओहादचे आजोबा अव्राहम मुंडेर यांना अद्याप सोडण्यात आलेले नाही, ते अजूनही गाझामध्ये हमासच्या ताब्यात आहेत.