भारतात भरपूर गुंतवणूक करा, चीनचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 06:42 AM2018-05-15T06:42:07+5:302018-05-15T06:42:07+5:30

सुवर्ण भरारी घेण्याच्या तयारीत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेत भरपूर गुंतवणूक करा, असे आवाहन चीनी नागरिकांना चीनच्या सरकारी मालकीची बँक द इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक आॅफ चायनाने केले आहे.

Invest in a lot in India, China's appeal | भारतात भरपूर गुंतवणूक करा, चीनचे आवाहन

भारतात भरपूर गुंतवणूक करा, चीनचे आवाहन

Next

बीजिंग : सुवर्ण भरारी घेण्याच्या तयारीत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेत भरपूर गुंतवणूक करा, असे आवाहन चीनी नागरिकांना चीनच्या सरकारी मालकीची बँक द इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक आॅफ चायनाने केले आहे. हे आवाहन करताना बँकेने चीनचा पहिला फक्त भारतासाठी सार्वजनिक गुंतवणुकीचा निधी (फंड) सुरू केला आहे.
अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची वुहान येथे अनौपचारिक भेट झाली होती. भेटीत उभय नेत्यांनी आपापल्या आर्थिक क्षमतांना नव्या दिशा देण्यासाठी द्विपक्षीय संबंधांचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भारतात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी वरील लक्षणीय पुढाकार घेतला गेला, असे निरीक्षकांचे मत आहे. या गुंतवणूक निधीचे नाव इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक क्रेडिट सुस्सी इंडिया मार्केट फंड असे आहे.
युरोप व अमेरिकेत नोंदणीकृत व भारतीय बाजारपेठेवर आधारित असलेल्या २० पेक्षा जास्त एक्स्चेंजेसमध्ये बँक गुंतवणूक करील. भारतात गुंतवणुकीसाठी चीनचा हा पहिलाच जाहीर झालेला फंड आहे, असे ग्लोबल टाइम्स दैनिकाने म्हटले. ही गुंतवणूक प्राधान्याने आर्थिक उद्योगात, त्यानंतर माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, आवश्यक वस्तू, कच्चा माल, औषधी, हेल्थ केअर व इतर उद्योगांत केली जाईल. (वृत्तसंस्था)

Web Title: Invest in a lot in India, China's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.