good news, आता Tweet १० हजार अक्षरात ?

By admin | Published: January 6, 2016 02:06 PM2016-01-06T14:06:57+5:302016-01-06T14:28:42+5:30

टि्वटर या लोकप्रिय सोशल नेटवर्किंगमधील अक्षरमर्यादा आता १० हजार अक्षरांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

Good news, now Tweet 10 thousand characters? | good news, आता Tweet १० हजार अक्षरात ?

good news, आता Tweet १० हजार अक्षरात ?

Next

ऑनलाइन लोकमत

न्यूयॉर्क, दि. ६ - सोशल नेटवर्किंगमध्ये लोकप्रिय असणा-या टि्वटरची  शब्दमर्यादा लवकरच वाढवण्यात येणार आहे. टि्वटरवर सध्या १४० अक्षरांपर्यंत मेसेज टाईप करता येतो. मात्र आता ही मर्यादा वाढवून १० हजार अक्षरांपर्यंत करण्यावर काम सुरु आहे. 
Re/code  या टेक्नॉलॉजी वेबसाईटने हे वृत्त दिले आहे. जगातील अनेक महत्वाच्या घटनांवर टि्वटरवरुन भाष्य केले जाते. अनेक सेलिब्रिटही टि्वटरवर असून, त्यांचे लाखो चाहते टि्वटरवरुन त्यांना फॉलो करतात. 
टि्वटर नव्या फिचरवर काम करत असून ज्यामुळे युझरला लवकरच पांरपारिक १४० पेक्षा जास्त अक्षरांमध्ये मेसेज टि्वट करता येईल. कंपनी सध्या १० हजारपर्यंत अक्षरमर्यादा वाढवण्याचा विचार करत आहे असे वृत्त रिकोड नेटने दिले आहे.  पहिल्या तिमाहीच्या अखेरपर्यंत टि्वटर हे नवे फिचर सुरु करण्याची शक्यता आहे. 
कंपनीने नवे फिचर लॉंच करण्याची अंतिम तारीख जाहीर केलेली नाही, पण अक्षरमर्यादा कमी-जास्त होऊ शकते असे रिकोड नेटने म्हटले आहे. 

Web Title: Good news, now Tweet 10 thousand characters?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.