अनुयायांनो, जेथे कुठे तुमचे शत्रू असतील तेथे त्यांना जाळून टाका - आयएस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 02:36 AM2017-09-30T02:36:38+5:302017-09-30T02:37:14+5:30

इस्लामिक स्टेटच्या (आयएस) गट नेत्याने आपल्या अनुयायांना जेथे कुठे तुमचे शत्रू असतील तेथे त्यांना जाळून टाका आणि धर्मावर श्रद्धा नसलेल्यांच्या प्रसारमाध्यमांच्या केंद्रांना लक्ष्य करा, असे आवाहन आॅडिओ रेकॉर्डिंगद्वारे केले आहे.

Followers, burn them wherever your enemies are. - IS | अनुयायांनो, जेथे कुठे तुमचे शत्रू असतील तेथे त्यांना जाळून टाका - आयएस

अनुयायांनो, जेथे कुठे तुमचे शत्रू असतील तेथे त्यांना जाळून टाका - आयएस

Next

कैरो : इस्लामिक स्टेटच्या (आयएस) गट नेत्याने आपल्या अनुयायांना जेथे कुठे तुमचे शत्रू असतील तेथे त्यांना जाळून टाका आणि धर्मावर श्रद्धा नसलेल्यांच्या प्रसारमाध्यमांच्या केंद्रांना लक्ष्य करा, असे आवाहन आॅडिओ रेकॉर्डिंगद्वारे केले आहे. गटाचा नेता अबू बकर अल-बगदादी याचा आवाज या रेकॉर्डिंगमध्ये आहे, असे अतिरेक्यांचे म्हणणे आहे.
बगदादी एकांतवासात असून, त्याने आपल्या पाठीराख्यांना संघर्ष सुरूच ठेवण्याचे आवाहन करून गेल्या जुलैमध्ये उत्तर इराकमधील मोसूल शहर इराकच्या सैन्याने परत मिळवल्यानंतरही जिहादींनी जे शौर्य दाखवले त्याबद्दल त्याने त्यांची पाठ थोपटली आहे.
आयएसच्या वतीने चालवल्या जात असलेल्या अल्-फुरकन केंद्राच्या वतीने हे आॅडिओ रेकॉर्डिंग जारी करण्यात आले.

Web Title: Followers, burn them wherever your enemies are. - IS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.