50 मजली इमारतींदरम्यान वालेंदा दोरखंडावर चालणार

By admin | Published: November 2, 2014 01:27 AM2014-11-02T01:27:44+5:302014-11-02T01:27:44+5:30

सोमवारी ते शिकागो शहरातील दोन गगनचुंबी इमारतींदरम्यान बांधलेल्या दोरखंडावरून चालत एका इमारतीच्या छतावरून दुस:या इमारतीच्या छतावर जाणार आहेत.

During the 50-storey building, Valenda will run on the rack | 50 मजली इमारतींदरम्यान वालेंदा दोरखंडावर चालणार

50 मजली इमारतींदरम्यान वालेंदा दोरखंडावर चालणार

Next
शिकागो : निक वालेंदा यांनी परत एकदा जीवाची बाजी लावण्याचा विडा उचलला आहे. सोमवारी ते शिकागो शहरातील दोन गगनचुंबी इमारतींदरम्यान बांधलेल्या दोरखंडावरून चालत एका इमारतीच्या छतावरून दुस:या इमारतीच्या छतावर जाणार आहेत. शिकागोतील मरिना सिटी वेस्ट टॉवर ते लिओ ब्रुनेट बिल्डिंग या 5क् मजली इमारतींवर हा दोरखंड बांधण्यात आला आहे. उल्लेखनीय म्हणजे, या इमारतींदरम्यान शिकागो नदी वाहते. 
निक यांनी डोळ्यावर पट्टी बांधून आणि कोणताही आधार न घेता ही दोरखंडावरची कसरत (स्कायवॉक)  केल्यास सर्वाधिक उंचीवर दोरखंडावरून तोल सांभाळत चालण्याचा विक्रम त्यांच्या नावे होईल. ते हे साहस सोमवारी रात्री करणार आहेत.  
जून 2क्13 मध्ये 1,5क्क् फूट उंचीवरील दोरखंडावरून चालण्याचा विक्रम निक यांच्या नावावर आहे. कोलोरॅडो नदी त्यांनी अशापद्धतीने पार केली होती. 
न्यूयॉर्कऐवजी शिकागोची निवड करण्यामागील कारण विचारले असता वालेंदा म्हणाले, ‘या शहरावर माङो प्रेम आहे. दोरखंडावरील कसरत करणो ही माङया कुटुंबाची परंपरा असून मीही त्या परंपरेचा पाईक आहे.  दोन वर्षाचा असल्यापासून मी दोरखंडावरील ही कसरत करतो. ’ (वृत्तसंस्था)
 
च्हा थरार डिस्कव्हरी नेटवर्कवरून 22 देशांत थेट प्रसारित केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेनुसार पहाटे साडेपाच वाजेपासून हे प्रसारण सुरू होईल. मात्र, प्रत्यक्ष थरार 7 वाजता सुरू होईल.
च्रात्रीच्या वेळी ही दोरखंडावरची कसरत धोकादायक असली तरी काल रात्री मी या इमारतींच्या छतावरून आकाशातील चमचमत्या तारे न्याहाळत असताना मला क्षितिजरेखा खुणावत होती. या मोहापायीच मी रात्रीच्यावेळी हे साहस करण्याचा विडा उचलला. मी केवळ कौटुंबिक परंपरा जोपासत आहे. हे माङया रक्तातच आहे, अशी प्रतिक्रिया निक वालेंदा यांनी दिली.

 

Web Title: During the 50-storey building, Valenda will run on the rack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.