सीरियात मृत्यूचे तांडव; पाच दिवसांत पडले 1146 बॉम्ब, ५५० जणांनी गमावले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 04:29 PM2018-03-02T16:29:22+5:302018-03-02T16:29:22+5:30

गेल्या पाच दिवसांमध्ये 550 लोकांचा बळी गेला आहे. यामध्ये 130 लहान मुलांचा समावेश आहे.

Death in Syria; 1146 bombs, 550 people lost their lives in five days | सीरियात मृत्यूचे तांडव; पाच दिवसांत पडले 1146 बॉम्ब, ५५० जणांनी गमावले प्राण

सीरियात मृत्यूचे तांडव; पाच दिवसांत पडले 1146 बॉम्ब, ५५० जणांनी गमावले प्राण

Next

घोउटा - सीरियामधील सध्याची काही फोटो समोर आले आहेत. ते पाहून आपला माणूसकीवरील विश्वासच उडेल. आपले ह्र्दय कापेल असे फोटो समोर आले आहेत. चार लाख लोकसंख्या असलेल्या घोउटी शहरामध्ये लढाऊ विमानातून बॉम्ब टाकण्यात आल्यामुळं येथे मृत्यूचे तांडव झाल्याचे भयानक चित्र तयार झालं आहे.  गेल्या पाच दिवसांमध्ये 550 लोकांचा बळी गेला आहे. यामध्ये 130 लहान मुलांचा समावेश आहे. मृत्यू पावलेले सर्वजण सामन्य लोक आहेत. त्यांचा काहीही दोष नसताना त्यांना मृत्यूनं कवटाळले आहे. हे सर्वकाही सत्तेसाठी सुरु आहे. 

सीरियातील घोउटा शहरामध्ये गेल्या पाच दिवसांत 1146 बॉम्ब टाकले गेले. यामध्ये 550 पेक्षा आधिक निर्दोष लोकांचा बळी गेला आहे. यामध्ये 130 लहान मुलाचा समावेश असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.  विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रने 30 दिवसांसाठी सीरियामध्ये सर्व युद्धावर बंदी घातली असताना हे निर्घूण हत्याकांड होत आहे. रशिया आणि सिरियाचे राष्ट्रपती असद यांच्या सेनेने हे आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि विनाशकारक हल्ला असल्याचे म्हटले आहे. 

कोण आपल्या स्वत: च्या लोकांवर आणि शहरावर बॉम्ब टाकू शकतो? आपण याचा विचारही कधी केला नसेल. पण हे घोउटामध्ये घडले आहे. येथे असलेल्या लहानमुलांचाही या निर्दयी लोकांनी विचार केला नाही हे विशेष. लहान मुलांच्या ओरडण्यानं ह्र्दयातून आश्रू येऊ शकतील. हे सर्व सत्तेसाठी केलं गेलं. सध्या सिरियामध्ये भयान अवस्था आहे. आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा बळी घेण्याचे घाणेरड राजकारण सध्या सुरु आहे. 

कित्येक लहान मुलांच्या ओरडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज तिथे घुमत असेल. ज्यांच्याकडून आपल्याला सुधारणेच्या आपेक्षा असतात अशावेळीच तेच मृत्यू घेऊन येतात. त्यावेळी फक्त बर्बादी आणि बर्बादीच होते. सत्तेसाठी तेथील काही लोकांना सर्वसामान्य जनतेचा मृत्यू ऑक्सिजनचे काम करत आहे. दहशतवाद्यांनी घोउटा शहरामध्ये आपलं राहण्याचे ठिकाण निवडले असून ते तिथे दडून बसले आहेत. लोकांच्या मध्ये राहुन ते तिथे मृत्यूचे तांडव उभे करत आहेत. गेल्या तीन महिन्यात सिरियामध्ये 1000 पेक्षा आधिक सर्वसामन्य लोकांचा मृत्यू झाला आहे. 

Web Title: Death in Syria; 1146 bombs, 550 people lost their lives in five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.