पाक पुन्हा अराजकाकडे

By admin | Published: August 20, 2014 02:54 AM2014-08-20T02:54:41+5:302014-08-20T02:54:41+5:30

मागील काही दिवसांपासून विरोधकांच्या आंदोलनाने ढवळून निघालेला पाकिस्तान पुन्हा अराजकाच्या उंबरठय़ावर उभा असल्याचे चित्र आज दिसून आले.

The culprit again regrets | पाक पुन्हा अराजकाकडे

पाक पुन्हा अराजकाकडे

Next
सुरक्षा दलांबरोबर चकमक : इम्रान खान, कादरींचे समर्थक रेड झोनमध्ये
इस्लामाबाद : मागील काही दिवसांपासून विरोधकांच्या आंदोलनाने ढवळून निघालेला पाकिस्तान पुन्हा अराजकाच्या उंबरठय़ावर उभा असल्याचे चित्र आज दिसून आले.  पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने करताना हजारो आंदोलकांनी आज रात्री संसदेकडे कूच केले आणि अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणा:या रेड झोनमध्ये त्यांनी प्रवेश केला. यावेळी आंदोलक व सुरक्षा दलांच्या चकमकीही झडल्या आणि लष्कराने या परिसराचा ताबा घेतला. नवाज शरीफ यांच्या निवासस्थानाभोवतीही लष्कर तैनात केले असल्याचे समजते.
दिवसभर इम्रान खान यांनी आक्रमक भाषण केले होते. आंदोलनात माङो काही बरेवाईट झाले तर तुम्ही नवाज शरीफ यांचा बदला घ्या, असेही ते म्हणाले व त्यानंतरच रेड झोनकडे कूच केले. या परिसरात संसद भवन, पंतप्रधानांचे निवासस्थान, अध्यक्षांचे निवासस्थान, सर्वोच्च न्यायालय, विविध देशांचे दूतावासही या भागात आहेत.
लष्कराने या भागाचा ताबा घेतल्याचे कळताच निदर्शकांनी आणखी आक्रमक होत घुसखोरी केली. यावेळी सुरक्षा दलांशी कादरींच्या पाकिस्तान अवामी तहरीकच्या कार्यकत्र्याची चकमक झाली. तसेच पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे कार्यकर्तेही सुरक्षा दलांवर चालून गेले. चकमकीत अनेक जखमी झाले. पोलिसांनी सेरेना चौकात कार्यकत्र्यावर लाठय़ा चालवल्या. त्यानंतर रुग्णवाहिका, पोलीस, लष्कर यांच्या गाडय़ांच्या आवाजाने वातावरण भरून गेले. 
 
निदर्शक आक्रमक
च्निदर्शकांना अडविण्यासाठी सुरक्षा दलांनी रस्त्यांवर कंटेनर लावले होते. ते कंटेनरही आंदोलकांनी हलविले. पोलिसांनी सुरुवातीला फार विरोध केला नाही. त्यांना तशा सूचना होत्या. इम्रान खान आणि कादरी यांच्या समर्थकांनी स्वतंत्रपणो संसदेकडे कूच केले असले तरी ते नंतर एकत्रच आले.
च्आंदोलकांकडे वायर कटर्स  व क्रेन्स होते. त्याच्या साह्याने त्यांनी अडथळ्यासाठी रस्त्यावर ठेवलेले कंटेनर्स हटविले. कादरी हे बुलेट-प्रूफ कारमधून, तर इम्रान खान ट्रकमधून संसदेकडे जात होते. 
च्पाकचे माहितीमंत्री परवेज रशीद म्हणाले की, आंदोलकांमध्ये महिला व मुलेही आहेत. त्यामुळे सरकारने नरमाईचे धोरण स्वीकारले. आंदोलकांना रक्तपात घडवायचा होता; पण आम्ही त्यांना ही संधी न देण्याचे ठरवले होते, असेही ते म्हणाले. 
 
राजीनामा देणार नाही.. निदर्शक रेड झोनमध्ये घुसले तेव्हा पंतप्रधान नवाज शरीफ त्यांच्या निवासस्थानीच होते. त्यांची पक्षाच्या नेत्यांशी चर्चा सुरू होती. त्यानंतर ते म्हणाले की, मी कोणत्याही स्थितीत राजीनामा देणार नाही.
 

 

Web Title: The culprit again regrets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.