Video: जगप्रसिद्ध 'मोनालिसा'च्या पेटिंगवर फेकले सूप, शेतकरी आंदोलनादरम्यान घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 06:05 PM2024-01-28T18:05:28+5:302024-01-28T18:05:58+5:30

फ्रान्समध्ये विविध मागण्यासांठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

climate-activists-throw-soup-on-mona-lisa-painting-amid-farmers-protests | Video: जगप्रसिद्ध 'मोनालिसा'च्या पेटिंगवर फेकले सूप, शेतकरी आंदोलनादरम्यान घडली घटना

Video: जगप्रसिद्ध 'मोनालिसा'च्या पेटिंगवर फेकले सूप, शेतकरी आंदोलनादरम्यान घडली घटना

Monalisa Painting : फ्रान्समध्ये विविध मागण्यासांठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान लूवर म्युझियममध्ये एक विचित्र घटना घडली. पर्यावरणासाठी काम करणाऱ्या दोन महिला कार्यकर्त्यांनी जगप्रसिद्ध मोनालिसाच्या पेंटिंगवर सूप फेकला. सुदैवाने पेंटिंग बुलेटप्रूफ ग्लासमध्ये ठेवलेली आहे. त्यामुळे पेंटिंगला कोणतेही नुकसान झाले नाही.

या घटनेनंतर संग्रहालयात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत पेंटिंगला काळ्या पडद्याने झाकून टाकले. इंधनाच्या वाढत्या किमती आणि नियमांचे सुलभीकरण या मागणीसाठी पॅरिसमध्ये शेतकऱ्यांच्या निदर्शनेदरम्यान ही घटना घडली. यावेळी आंदोलकांनी कृषी व्यवस्थेत बदल करण्याची गरज आणि निरोगी, शाश्वत अन्नाचे महत्त्व यावर भर दिला. 

यापूर्वी ॲसिड फेकण्यात आले
मागे एकदा एका व्यक्तीने मोनालिसाच्या पेंटिंगवर ॲसिड फेकले होते, ज्यामुळे पेंटिंगचे नुकसान झाले. यानंतर 1950 पासून पेंटिंगला बुलेटप्रूफ काचेमध्ये ठेवण्यात आले. पेंटिंगवर सूप फेकण्याची घटना नवीन नाही, कारण 2022 मध्येही एका व्यक्तीने पेंटिंगवर केक फेकून मारला होता. यावेळी त्याने "पृथ्वीचा विचार करा" असे आवाहन केले होते.

1911 मध्ये पेंटिंग चोरीला गेले होते
विशेष म्हणजे, 1911 मध्ये लूव्रे म्युझियममधून पेटिंग चोरीला गेले होते. त्यावेळच्या संग्रहालयातील कर्मचारी विन्सेंझो पेरुगिया याचा चोरीच्या घटनेत हात होता. पुढे हे पेंटिंग 1913 मध्ये इटलीतील एका बाजारात विकण्याचा प्रयत्न केला गेला, पण, सुदैवाने ते परत मिळाले. या चोरीने खळबळ उडवून दिली होती. 

Web Title: climate-activists-throw-soup-on-mona-lisa-painting-amid-farmers-protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.