अतिरेक्यांशी संबंधाचे वृत्त चीनने फेटाळले

By admin | Published: June 11, 2015 12:00 AM2015-06-11T00:00:45+5:302015-06-11T00:00:45+5:30

मणिपूरमध्ये भारतीय लष्करी ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवादी संघटनेशी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांचे संबंध असल्याचे वृत्त चीनने बुधवारी फेटाळून लावले

China refuses to report to terrorists | अतिरेक्यांशी संबंधाचे वृत्त चीनने फेटाळले

अतिरेक्यांशी संबंधाचे वृत्त चीनने फेटाळले

Next

बीजिंग : मणिपूरमध्ये भारतीय लष्करी ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवादी संघटनेशी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांचे संबंध असल्याचे वृत्त चीनने बुधवारी फेटाळून लावले. ‘संबंधित वृत्त हे पूर्णपणे बिनबुडाचे आहे’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते होंग ली यांनी पीटीआयला सांगितले. पीटीआयने ईमेल पाठवून या वृत्ताबाबत चीनची प्रतिक्रिया विचारली होती.
चीनची इतर देशांच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ न करण्याची भूमिका असून ती आम्ही कसोशीने पाळतो. आम्ही कोणत्याही देशातील सरकारविरोधी घटकांना पाठिंबा देणार नाही, असेही ते म्हणाले. तत्पूर्वी चीनचे लष्कर भारताच्या ईशान्येकडील भागातील दहशतवादी संघटनांना मदत करत असल्याचा आरोप विचारवंतांच्या गटांतील अधिकाऱ्यांनीही फेटाळून लावला होता. ४ जून रोजी भारतीय लष्करी ताफ्यावर मणिपूरमध्ये हल्ला होऊन १८ जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर हल्ल्यात सहभागी दहशतवादी संघटनांशी चिनी लष्कराचा संबंध असल्याचे वृत्त आले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: China refuses to report to terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.