डॉक्टरचा कारनामा! कॅन्सर रुग्णाला औषध म्हणून लावला लिंबू, सिमेंटचा लेप, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 01:40 PM2023-11-02T13:40:43+5:302023-11-02T13:41:53+5:30

एका महिलेने कॅन्सरग्रस्त आईच्या उपचारासाठी 200,000 युआन (सुमारे 22.76 लाख रुपये) देऊन देखील तिच्यासोबत कशी फसवणूक झाली हे आता उघड केलं आहे. 

china fake china doctor tricks breast cancer patient into bizarre cement treatment probe launched | डॉक्टरचा कारनामा! कॅन्सर रुग्णाला औषध म्हणून लावला लिंबू, सिमेंटचा लेप, नेमकं काय घडलं?

डॉक्टरचा कारनामा! कॅन्सर रुग्णाला औषध म्हणून लावला लिंबू, सिमेंटचा लेप, नेमकं काय घडलं?

चीनमध्ये फसवणुकीची अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जी वाचून तुम्ही हैराण व्हाल. येथे स्वयंघोषित ट्यूमर रिसर्च इन्स्टिट्यूटद्वारे तपास सुरू आहे. यांनी केलेल्या फसवणुकीत एका महिलेला आपला जीवही गमवावा लागला. एका महिलेने कॅन्सरग्रस्त आईच्या उपचारासाठी 200,000 युआन (सुमारे 22.76 लाख रुपये) देऊन देखील तिच्यासोबत कशी फसवणूक झाली हे आता उघड केलं आहे. 

साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP) नुसार, वांग नावाच्या महिलेला 2021 च्या कळलं की तिच्या आईला लास्ट स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर आहे. निदान झाल्यानंतर महिलांची वुहानमधील पारंपारिक चिनी औषधी डॉक्टरांशी ओळख झाली. ज्याने कॅन्सरवर  उपचार करण्यात निपुण असल्याचा दावा केला होता. त्या यू नावाच्या माणसाला त्याच्या डोंग्युसनबाओ ट्यूमर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये भेटायला गेले, जिथे त्याने त्यांना सांगितलं की त्याने कॅन्सर नष्ट करू शकणारं औषध शोधलं आहे.

वांगच्या म्हणण्यानुसार, यू याने दोन्ही महिलांना पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला, कॅन्सरच्या उपचारांसाठी विश्वसनीय पेटंट कागदपत्रं आणि प्रतिष्ठित पुरस्कार प्रमाणपत्रे दाखवली. यानंतर, वांगच्या आईने ताबडतोब यू कडून 20,000 युआन (सुमारे 2,30,000 रुपये) किंमतीचं औषध घेतलं. वांग म्हणाली की ती आणि तिची आई एका वर्षाच्या कालावधीत ईशान्य लिओनिंग प्रांतातील त्यांच्या घरातून सहा वेळा वुहानला गेली. या प्रवासासाठी त्याला 200,000 युआनपेक्षा जास्त खर्च आला.

त्वचेवर लावला सिमेंटचा लेप

रिपोर्टनुसार, वांगने सांगितलं की, हे औषध आपल्या आईला देण्यासोबतच यूने तिच्या स्तनांमध्ये अनेक इंजेक्शन्सही दिली. तसेच त्वचेवर सिमेंट आणि लिंबू यांचे मिश्रण लावण्यास सांगितले आणि दावा केला की यामुळे कॅन्सरच्या गाठी कमी होण्यास मदत होईल. माझ्या आईने त्याच्या सूचनांचं पालन केलं पण दोन महिने असं केल्यावर तिची त्वचा जळाली. या एप्रिल महिन्यात आईची प्रकृती बिघडली आणि स्थानिक डॉक्टरांनी तिला सांगितले की तिच्या शरीरात कॅन्सरच्या पेशी पसरल्या आहेत. मात्र, जूनमध्ये आईचा मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: china fake china doctor tricks breast cancer patient into bizarre cement treatment probe launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.