ट्रम्प यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या आॅस्कर विजेत्यास पाठवला बॉम्ब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 03:53 AM2018-10-26T03:53:30+5:302018-10-26T03:53:35+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सातत्याने टीका करणारे आॅस्कर विजेते कलाकार रॉबर्ट दी निरो यांनाही पार्सल बॉम्ब पाठवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Bomb sent to Oscars winner who constantly criticized Trump | ट्रम्प यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या आॅस्कर विजेत्यास पाठवला बॉम्ब

ट्रम्प यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या आॅस्कर विजेत्यास पाठवला बॉम्ब

googlenewsNext

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सातत्याने टीका करणारे आॅस्कर विजेते कलाकार रॉबर्ट दी निरो यांनाही पार्सल बॉम्ब पाठवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या घरी आणि सीएनएन वृत्तवाहिनीच्या न्यूयॉर्कमधील कार्यालयात टपालातून स्फोटके पाठविल्याचे बुधवारी समोर आले होते. त्यानंतर आता डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक असलेल्या रॉबर्ट यांनाही पाकिटातून पाइप बॉम्ब पाठवला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही राजकीय हिंसाचाराची कृती असून त्याचा सर्वांना एकजुटीने मुकाबला केला पाहिजे असे ट्रम्प यांनी म्हटले. सीएनएनच्या न्यूयॉर्क कार्यालयात टपालाद्वारे पाठविलेले स्फोटकांचे पाकिट सापडल्यानंतर तिथे अजून तशा काही वस्तू नाहीत ना याचा शोध घेण्यास हे कार्यालय रिकामे करण्यात आले. (वृत्तसंस्था)

Web Title: Bomb sent to Oscars winner who constantly criticized Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.