महाकाय अजगराने महिलेला गिळले!, अख्खा मृतदेह सापडला पोटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 03:42 AM2018-06-17T03:42:07+5:302018-06-17T03:42:07+5:30

इंडोनेशियात सुलावेसी किनाऱ्यालगतच्या मुना बेटावर एका प्रचंड अजगराने मळ्यात काम करणा-या एका महिलेस अख्खे गिळल्याची घटना घडली.

Bigger woman swallowed woman, found her whole body in stomach | महाकाय अजगराने महिलेला गिळले!, अख्खा मृतदेह सापडला पोटात

महाकाय अजगराने महिलेला गिळले!, अख्खा मृतदेह सापडला पोटात

Next

मकास्सर (इंडोनेशिया): इंडोनेशियात सुलावेसी किनाऱ्यालगतच्या मुना बेटावर एका प्रचंड अजगराने मळ्यात काम करणा-या एका महिलेस अख्खे गिळल्याची घटना घडली.
पर्सिआपन लवेला गावात भाजीच्या मळ्यात काम करणारी वा तिबा ही ५४ वर्षांची महिला शुक्रवारी रात्री घरी आली नाही, शनिवारी सकाळी गावकºयांनी शोध घेतला असता, मळ्यात तिबाच्या स्लीपर व विळा पडल्याचे दिसते. त्याच्या जवळच पोट फुगलेला एक अजगर सुस्तावून पडलेला दिसला.
वा तिबाला कदाचित त्या अजगरानेच खाल्ले असावे, असा संशय आल्याने गावकºयांनी त्या २३ फुटी अजगरास ठार मारले व त्याचे पोट फाडले. त्याच्या पोटात वा तिबाचा कोणतीही इजा न झालेला मृतदेह आढळून आला. गुदमरून तिचा मृत्यू झाला होता. सहा मीटर किंवा त्याहून मोठे अजगर इंडोनशिया व फिलिपीन्समध्ये बरेच आढळतात. बºयाच वेळा हे अजगर कोंबडी वा कुत्रा यारखे लहान प्राणी खातात. परंतु अजगराने माणसाला अखंड गिळल्याचे क्वचितच घडते. दोनच महिन्यांपूर्वी सुनावेसी बेटावरच एक शेतकरी अजगराकडून मारला गेला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Bigger woman swallowed woman, found her whole body in stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.