ऑस्ट्रेलियाने वाचवली अब्रू, अखेरच्या सामन्यात लंकेवर विजय

By admin | Published: February 22, 2017 10:24 PM2017-02-22T22:24:12+5:302017-02-22T22:24:12+5:30

कर्णधार अॅरॉन फिंच (53) आणि मायकल क्लिंगर(62) यांच्या अर्धशतकांनंतर फिरकी गोलंदाज अॅडम झंपा आणि जेस्म फॉकनरने केलेल्या टिच्चून मा-याच्या बळावर

Australia saved the game, defeating Sri Lanka in the last match | ऑस्ट्रेलियाने वाचवली अब्रू, अखेरच्या सामन्यात लंकेवर विजय

ऑस्ट्रेलियाने वाचवली अब्रू, अखेरच्या सामन्यात लंकेवर विजय

Next
>ऑनलाइन लोकमत
अॅडलेड, दि. 22- कर्णधार अॅरॉन फिंच (53) आणि मायकल क्लिंगर(62) यांच्या अर्धशतकांनंतर फिरकी गोलंदाज अॅडम झंपा आणि जेस्म फॉकनरने केलेल्या टिच्चून मा-याच्या बळावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर अंतिम सामन्यात विजय मिळवला. लंकेला 41 धावांनी नमवत ऑस्ट्रेलियाने क्लिन-स्विपची नामुष्की टाळली. 
पहिल्या दोन सामन्यांतील पराभवामुळे कांगारूंच्या संघावर क्लिन स्विपचं संकट घोंगावत होतं. अॅडलेडमध्ये झालेल्या या सामन्यात फिंच आणि क्लिंगरच्या फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 6 गडी बाद 187 धावा बनवून 188 धावांचं आव्हान लंकेला दिलं होतं. मात्र, झंपा(25 धावात 3 विकेट) आणि फॉकनर(20 धावात 3 विकेट) यांनी केलेल्या धारधार मा-यामुळे लंकेचा संघ 18 षटकात 146 धावांमध्येच गारद झाला. सलामीवीर दासून मुनावीरा (३७) याने श्रीलंकेला चांगली सुरुवात करून दिली; परंतु कर्णधार उपुल थरंगा फक्त १४ धावाच करू शकला. श्रीलंकेने नियमित अंतराने विकेट गमावल्या आणि एकदा तर त्यांची स्थिती ६ बाद ९१ अशी अवस्था होती. त्यानंतर मिलिंद श्रीवर्धने याने ३५ धावा केल्या; परंतु त्यामुळे फक्त पराभवाचे अंतर थोडे कमी झाले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : २0 षटकांत ६ बाद १८७. (अ‍ॅरोन फिंच ५३, माइकल क्लिंगर ६२, ट्रेव्हिस हेड ३0, बेन डंक २८. लसिथ मलिंगा २/३५, दासून शनाका २/२७).
श्रीलंका : १८ षटकांत सर्वबाद १४६. (दासून मुनावीरा ३७, मिलिंद श्रीवर्धने ३५. अ‍ॅडम जम्पा ३/२५, फॉकनर ३/२0).

Web Title: Australia saved the game, defeating Sri Lanka in the last match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.