टाइम ट्रॅव्हलर सैनिकाने 2001 मध्येच केली होती महामारीची भविष्यवाणी; सांगितला 'जगाचा अंत'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 08:29 AM2021-10-05T08:29:05+5:302021-10-05T08:31:43+5:30

त्यांचे भीतीदायक दावे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बिजिंगमधील 2008 चे ऑलिम्पिक काही कारणास्तव रद्द केले जाईल. एक महामारी अमेरिकेला प्रभावित करेल आणि ती 2036 पर्यंत सुरू राहील.

America Self proclaimed time traveler makes horrible predictions, claims computer destroy world | टाइम ट्रॅव्हलर सैनिकाने 2001 मध्येच केली होती महामारीची भविष्यवाणी; सांगितला 'जगाचा अंत'

टाइम ट्रॅव्हलर सैनिकाने 2001 मध्येच केली होती महामारीची भविष्यवाणी; सांगितला 'जगाचा अंत'

googlenewsNext

वॉशिंग्टन - टाइम ट्रॅव्हलिंग सारख्या गोष्टी आपण चित्रपटांतून अथवा काल्पनिक कथांमधून ऐकल्या आहेत. मात्र, एका व्यक्तीने याच्या वास्तविकतेचा दावा केला आहे. ही व्यक्ती स्वतःला भविष्यातून आलेला एक टाइम ट्रॅव्हलर सांगत आहे. एवढेच नाही, तर तो जगाच्या अंताची भविष्यवाणीही करत होता. आपले नाव John Titor सांगणाऱ्या या व्यक्तीने 2000 आणि 2001 मध्ये भविष्यासंदर्भात अनेक दावे केले होते आणि मानवी जीवनाच्या उलट्या गिनतीला सुरुवात झाली असल्याचे म्हटले होते.

ही कहाणी एखाद्या चित्रपट पटकथालेखकांना आवडू शकते. टायटरने इंटरनेटवर दावा केला, की तो 2036 पासूनचा एक अमेरिकन सैनिक आहे, जो फ्लोरिडाच्या टाँपा येथून आला आहे. त्याने म्हटले आहे, की त्याला एका सरकारी टाइम ट्रॅव्हलची जबाबदारी देण्यात आली होती आणि 1975 मधून आयबीएम 5100 संगणक आणण्यासाठी पाठविले होते. टायटर म्हणाले, की "या मिशनसाठी विशेषत्वाने माझी निवड करण्यात आली आहे. कारण माझे आजोबा 5100 कंप्यूटरची प्रोग्रॅमिंग आणि असेंबलिंगमध्ये सहभागी होते.'

कंप्यूटर बगमुळे होईल जगाचा अंत -
टायटरने म्हटले आहे, की 2000 मध्ये त्याने 'वैयक्तीक कारणास्तव' काही वेळ थांबण्याचा आणि भीतीदायक भविष्यवाणी करण्याचा निर्णय घेतला. त्याने अमेरिकेत गृह युद्ध आणि सीमांवर संघर्ष, लोकसंख्या स्फोटा सारख्या कारणांमुळे मृत्यूंचा दावा केला आहे. याशिवाय, 2015 मध्ये अमेरिका आणि रशियादरम्यान तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली होती, पण ती खोटी ठरली. टायटरचा सर्वात मोठा दावा, एका कंप्यूटर बगने जग नष्ट होण्याचा होता. 

त्यांचे भीतीदायक दावे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बिजिंगमधील 2008 चे ऑलिम्पिक काही कारणास्तव रद्द केले जाईल. एक महामारी अमेरिकेला प्रभावित करेल आणि ती 2036 पर्यंत सुरू राहील. टायटर यांनी मार्च 2001मध्ये शेवटची इंटरनेट पोस्ट केली. यानंतर ते कायमचेच बेपत्ता झाले. त्याच्या शेवटच्या पोस्टमध्ये, त्यांनी सुचवले होते, की प्रत्येकाने नेहमीच आपल्या कारमध्ये गॅसची कॅन ठेवायला हवी, ती रस्त्यात अचानकपणे गाडीत बिघाड झाल्यास कामी येऊ शकते.

Web Title: America Self proclaimed time traveler makes horrible predictions, claims computer destroy world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.