इम्रान खान की नवाझ शरीफ, कोणाच्या सत्तेसोबत काम करायला आवडेल? अमेरिकेने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 03:46 PM2024-02-13T15:46:54+5:302024-02-13T15:48:07+5:30

पाकिस्तानात कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने संभ्रमावस्था कायम

America reaction on Pakistan Elections 2024 US Matthew Miller on Pakistan election work with new government Imran Khan Nawaz Sharif Bilawal Bhutto | इम्रान खान की नवाझ शरीफ, कोणाच्या सत्तेसोबत काम करायला आवडेल? अमेरिकेने केला खुलासा

इम्रान खान की नवाझ शरीफ, कोणाच्या सत्तेसोबत काम करायला आवडेल? अमेरिकेने केला खुलासा

America Reaction on Pakistan Elections 2024: पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुका ८ फेब्रुवारीला पार पडल्या. लोकांनी त्यांच्या आवडत्या पक्षाला आणि त्यांच्या उमेदवारांना सरकार स्थापन करण्यासाठी मतदान केले. पाकिस्तानात कोणाचे सरकार स्थापन होणार याची पाकिस्तानातील जनता तसेच जगभरातील देश वाट पाहत होते, परंतु अनेक दिवस उलटूनही सरकारचे चित्र स्पष्ट होताना दिसत नाही. कारण सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. याच दरम्यान, पाकिस्तानला वेळोवेळी छुपी किंवा उघडपणे मदत करणाऱ्या अमेरिकेला पाकिस्तानात कुणाच्या सरकारसोबत काम करायला आवडेल? याबाबतची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांचे वक्तव्य समोर आले आहे. पाकिस्तानमध्ये अद्याप नवीन सरकार स्थापन झालेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रवक्त्याने सांगितले की, अमेरिकेने निवडणुकीपूर्वीच सांगितले होते की, पाकिस्तानचे लोक ज्याला निवडून देतील त्यांच्यासोबत अमेरिका एकत्र काम करेल. आम्ही अजूनही म्हणत आहोत की देशात जे सरकार स्थापन होईल, अमेरिका त्यांच्यासोबत काम करायला तयार असेल.

'निवडणुकीत झालेल्या अनियमिततेची चौकशी झाली पाहिजे'

निवडणुकीतील अनियमिततेबाबत प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ते म्हणाले की, निवडणुकीत लोक त्यांच्या आवडीनुसार सरकार निवडतात, या निवडणुकीत स्पर्धा होती. अशा परिस्थितीत निवडणुकीत अनियमितता झाली असेल तर त्याची स्पष्ट चौकशी व्हायला हवी. प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला देशात कायद्याचे राज्य, राज्यघटनेचा आदर, स्वतंत्र प्रेस आणि समाजाचा आदर पाहायचा आहे.निवडणुकीत हिंसाचार झाला असून इंटरनेट आणि मोबाईल फोनवर बंदी घातल्याने नकारात्मक परिणाम झाला आहे. अमेरिका याचा निषेध करते, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

Web Title: America reaction on Pakistan Elections 2024 US Matthew Miller on Pakistan election work with new government Imran Khan Nawaz Sharif Bilawal Bhutto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.