26 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी सगळ्यांसाठी खुलं झालं होतं इंटरनेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 04:19 PM2017-08-24T16:19:09+5:302017-08-24T18:22:00+5:30

इंटरनेटमुळे आज जरी जग जवळ आलेले असले तरी सायबर क्राईमच्या रुपातील त्याचे दुष्परिणामही भोगावे लागत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने इंटरनेटचा वापर जबाबदारीने करायला हवा.

26 years ago today, the World Wide Web opened to the public | 26 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी सगळ्यांसाठी खुलं झालं होतं इंटरनेट

26 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी सगळ्यांसाठी खुलं झालं होतं इंटरनेट

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 23 - आज तुम्ही स्वत:ला  इंटरनेट शिवाय विचार करु शकता का ? नाही ना. 1991 मध्ये आजच्या दिवशी इंटरनेट सगळ्यांसाठी खुलं करण्यात आलं होत. तेव्हांपासून आजतागत इंटरनेट वापरणाऱ्यांची सख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आणि भविष्यातही ती संख्या वाढतच जाणार आहे. इंटरनेट हे संगणकांच्या जगभर पसरलेल्या कित्येक लाख अशा नेटवर्कस्‌चे मिळून बनलेले एक प्रचंड नेटवर्क आहे. त्यालाच World Wide Web (WWW) असं म्हटलं जातं. 

1969 मध्ये अमेरिकेने अनुदान दिलेल्या एका प्रोजेक्टरने इंटरनेशनल संगणक नेटवर्क विकसित केले . जगातील छोट्या नेटवर्कला जोडणारे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय . 1992 मध्ये स्वित्झलंड येथे सेंटर फॉर उरोपिन न्यूक्लिअर रिसर्च मधून (CERN) वेब अर्थात वर्ल्ड वाइड वेब (WWW) आपल्या पर्यंत पोहचले . ह्याच्या पूर्वी इंटरनेट म्हणजे ग्राफिक्स , एनीमेशन , ध्वनी व्हिडिओ इंटरफेस नसलेल माध्यम होते. वेबमुळे ह्या सर्व गोष्टी नेटवर पहाणे शक्य झाले. आणि इंटरनेट 21 व्या शतकातील एकमेकांच्या संपर्काचे प्रभावी साधन बनले. इंटरनेट वायर, केबल, सॅटॅलाइट यांच्याशी जोडून बनले आहे . तर वेब इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या डाटा सही जोडून देतो ते वेब .इंटरनेट चा वापर खलील गोष्टी साठी सामान्यत केला जातो.

सपर्क :- इंटरनेटद्वारे केली जाणारी ही एक लोकप्रिय बाब आहे . तुम्ही ईमेल च्याद्वारे जगातील कुठल्याही व्यक्तिशी संपर्क साधू शकता . आवडीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी भाग घेवू शकता इतकेच नाही तर तुम्ही स्वतचं वेब पेज म्हणजेच वेब साईट ही बनवू शकता .

शॉपिंग :- इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही शॉपिंग करू शकता किवा एखादी वस्तु विकूही शकता . बाजारात आलेल्या नविन वस्तुंची माहिती इंटरनेटमुळे आपणास बघायला मिळते. एलेक्ट्रोनिक्स कार्ड किवा डेबिट कार्ड वापरून तुम्ही खरेदी करू शकता .

सर्चिंग :- एखाद्या विषयावर माहिती शोधणे इंटरनेट मुळे सोपे झाले आहे . जगातील कुठल्या ही वस्तूची अथवा गोष्टीची माहिती हवी असल्यास ती आपणास इंटरनेटमुळे मिळू शकते. शिवाय इ-बुकमुळे कुठल्याही ग्रंथालायाची बुक्स, पुस्तके आपणास मोफत वाचायला भेटतात . शिवाय ऑनलाइन न्यूज़ ही वाचायला किवा व्हीडीओद्वारे बघायला मिळतात.

मनोरंजन :- या विषयावर सांगाव तेवढ कमी आहे कारण या विषयावर इंटरनेट वर भरपूर माहितींचा खजाना आहे . संगीत , चित्रपट , मासिक तसेच आता ऑनलाइन चित्रपट ही आपण नेटवर पाहू शकतो . सध्या ऑनलाइन गेम्सही उपलब्ध आहेत .

इंटरनेटमुळे आज जरी जग जवळ आलेले असले तरी सायबर क्राईमच्या रुपातील त्याचे दुष्परिणामही भोगावे लागत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने इंटरनेटचा वापर जबाबदारीने करायला हवा.

 

Web Title: 26 years ago today, the World Wide Web opened to the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.