आदिवासी विकास विभाग तीन शाळांची मान्यता रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 11:51 PM2018-10-05T23:51:01+5:302018-10-05T23:51:18+5:30

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी अंतर्गत एकूण १९ नामांकित इंग्रजी शाळेत विद्यार्थी प्रवेशित असून, सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात एकूण तीन शाळांची मान्यता शासनाने रद्द केली असून तेथील प्रवेशित विद्यार्थ्यांना इतर विद्यालयांमध्ये समायोजित करण्याचत येणार आहे.

 Tribal development department canceled the approval of three schools | आदिवासी विकास विभाग तीन शाळांची मान्यता रद्द

आदिवासी विकास विभाग तीन शाळांची मान्यता रद्द

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी अंतर्गत एकूण १९ नामांकित इंग्रजी शाळेत विद्यार्थी प्रवेशित असून, सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात एकूण तीन शाळांची मान्यता शासनाने रद्द केली असून तेथील प्रवेशित विद्यार्थ्यांना इतर विद्यालयांमध्ये समायोजित करण्याचत येणार आहे.
मान्यता रद्द करण्यात आलेली शाळा मानसिंग नाईक प्रायमरी विद्यालय, सायखेडा ता. सोनपेठ जि. परभणी या शाळेतील विद्यार्थ्यांचे हायटेक प्राथमिक व माध्यमिक विद्यालय एरडेंश्वर ता. पूर्णा जि. परभणी या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. तर शांतिनिकेतन पब्लिक स्कूल सिडको, नांदेड या मान्यता रद्द झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स पासदगाव, ता. जि. नांदेड येथे आणि भिवराई इंग्लिश मेडियम स्कूल, लातूर या मान्यता रद्द झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे गणपती इंग्लिश स्कूल भोकरदन, जि. जालना आणि ईश्वर देशमुख डे - बोर्डींग स्कूल डिग्रस, जि. यवतमाळ येथे करण्यात येणार आहे. समायोजनाद्वारे निश्चित झालेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे त्वरीत समायोजन करावे. तसेच पालकांनी उपरोक्त मान्यता रद्द झालेल्या शाळेमध्ये आपल्या पाल्यास शिक्षणाकरिता ठेवू नये, असे आवाहन कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांनी केले आहे. मान्यता रद्द झालेल्या शाळेस सन २०१८-१९ मध्ये कोणत्याही प्रकारचे अनुदान अदा केले जाणार नाही. विद्यार्थ्यांना त्वरीत समायोजित करावयाच्या शाळेत प्रवेशित करावे.

Web Title:  Tribal development department canceled the approval of three schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.