ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:08 AM2019-04-27T00:08:21+5:302019-04-27T00:08:36+5:30

हिंगोली/कळमनुरी : सिंचन विहीर मंजूर करून देण्यासाठी दहा हजारांची लाच मागणाऱ्या कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील ग्रामविकास अधिकाºयास एसीबीच्या पथकाने पकडले.

 In the trap of the Rural Development Officer ACB | ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली/कळमनुरी : सिंचन विहीर मंजूर करून देण्यासाठी दहा हजारांची लाच मागणाऱ्या कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील ग्रामविकास अधिकाºयास एसीबीच्या पथकाने पकडले. ही कारवाई २६ एप्रिल रोजी कळमनुरी येथे दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास करण्यात आली.
सविस्तर माहिती अशी की, कळमनुरी पंचायत समिती अंतर्गत वाकोडी येथे कार्यरत ग्रामविकास अधिकारी उत्तम ताराचंद आडे यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराच्या सिंचन विहिरीची संचिका ही कळमनुरी येथील पंचायत समितीत दाखल करून ओळखीने सिंचन विहीर मंजूर करून देण्यासाठी ही लाच मागितली होती. तडजोडीअंती दहा हजार रूपये देण्याचे ठरले. मात्र ही लाच देण्याची मनस्थिती नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने सापळा रचून आरोपी ग्राम विकास अधिकारी उत्तम आडे यास पकडले.
आडे याने तक्रारदाराकडे दहा हजार रूपये लाचेची मागणी करत सदर रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शवून लाच मिळविण्याचा प्रयत्न केला.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक संजय लाटकर, अप्पर पोलीस अधीक्षिका अर्चना पाटील व पोलीस उपअधीक्षक रवींद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि नितीन देशमुख, पोनि जितेंद्र पाटील, पोहेकॉ अभिमन्यू कांदे, आढाव, विजय उपरे, पोना महारूद्र कबाडे, विनोद देशमुख, जमीर शेख, संतोष दुमाने, प्रमोद थोरात, अवि किर्तनकार आदींनी केली.

Web Title:  In the trap of the Rural Development Officer ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.