वसमत येथे तीन लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:12 AM2018-09-12T00:12:50+5:302018-09-12T00:13:09+5:30

गुटख्याच्या होलसेल विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी छापे मारले. यात चार विक्रेत्यांकडून ३ लाख २५ हजार ५१५ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला.

 Three lakh gutkha seized at Vasmat | वसमत येथे तीन लाखांचा गुटखा जप्त

वसमत येथे तीन लाखांचा गुटखा जप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : गुटख्याच्या होलसेल विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी छापे मारले. यात चार विक्रेत्यांकडून ३ लाख २५ हजार ५१५ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला.
वसमतमध्ये खुले आम गुटखा विक्री होत असतो. भरबाजारात गुटख्याचे मुख्य होलसेल विक्री केंद्र आहेत. परवाना असल्याप्रमाणे येथे व्यवहार चालतो. कधीच होलसेल व मुख्य वितरकावर कारवाई होत नाही. एलसीबीच्या पथकाने मंगळवारी होलसेल गुटखा विक्री करणाऱ्या चार केंद्रावर छापा मारला. यात ३ लाख २५ हजार ५१५ रुपयांचा गुटखा जप्त जप्त केला. हे गुटखा विक्रेते लहान मासे असल्याचे समोर येत आहे. कोट्यवधी रुपयांचा गुटखा वसमतला येतो. अनेक मोठे मासे या व्यवहारात आहेत. तेच सर्व व्यवहार सांभाळत असल्याचे वृत्त आहे. मंगळवारी चार विक्री केंद्रावर छापे मारण्याची कारवाई झाली. यात निवृत्ती मारोती जाधव (रा. विरेगाव ) याच्याकडून १ लाख २८ हजार ५९० रु., राजेश दत्तराव शेवाळे (रा. वसमत) याचा ५९ हजार ३३० रुपयांचा गुटखा जप्त केला. तर बालासाहेब तुकाराम पैंजणे (रा. वसमत) याचा ५९११८ रुपयांचा, शेख शकील शेख अहेमद याचा ६८३३0 रुपयांचा गुटखा जप्त केला. या छाप्यात पोनि जगदीश भंडारवार सुभान केंद्रे, अभिमान लंबे, नाना पोले, बालाजी बोके, शंकर जादव, गजानन राठोड, क्षानेश्वर पंचलिंगे, अमित मोडक, हेमंत दराडे, भगवान आडे, ज्ञानेश्वर सावळे, गणेश राठोड आदींसह स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सहभागी होते. पोलीस तपासात हा गुटखा कोणाकडून आणला, हे समोर येण्याची शक्यता आहे.

Web Title:  Three lakh gutkha seized at Vasmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.