हिंगोलीत पुन्हा अतिक्रमण हटाव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:34 PM2019-01-12T22:34:41+5:302019-01-12T22:35:04+5:30

शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपालिकेने शनिवारी अचानक हाती घेतली. या मोहिमेत औंढा मार्गासह बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. मुलीच्या छेडछाडीच्या एका प्रकारानंतर या अतिक्रमणांवर गंडांतर आले.

 Removal of encroachment in Hingoli ... | हिंगोलीत पुन्हा अतिक्रमण हटाव...

हिंगोलीत पुन्हा अतिक्रमण हटाव...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपालिकेने शनिवारी अचानक हाती घेतली. या मोहिमेत औंढा मार्गासह बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. मुलीच्या छेडछाडीच्या एका प्रकारानंतर या अतिक्रमणांवर गंडांतर आले.
हिंगोली शहरातील विविध भागातील अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपालिकेने गतवर्षी मोहीम राबविली होती. यामध्ये शहराच्या सर्वच भागातील रस्त्यांवर आलेल्या ओट्यांपासून ते अवैध बांधकामांवर जेसीबी चालविला होता. गांधी चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय, पळशी रोड, जवाहर रोड, शहरातून जाणारा अकोला रोड तर मोकळा श्वास घेवू लागला होता. एवढेच नव्हे, तर जुन्या भागातील व नवीन नगरांमधील अतिक्रमणांवरही टाच आणली होती. या मोहिमेला विरोध अन् समर्थन दोन्हीही तेवढ्याच प्रमाणात मिळाले होते. एवढेच नव्हे, तर रामलीला मैदानही महसूल प्रशासनाने मोकळे केले होते. मात्र पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. यातच मागील आठवड्यातील एका मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणानंतर या अतिक्रमणांकडे लक्ष वेधल्या गेले.
हिंगोली पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुधाकर आडे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा ताफा अग्रसेन चौक परिसरात सकाळी दाखल झाला. त्यांनी या मार्गावरील अतिक्रमणांवर जेसीबी चालविला. यात अनेकांच्या टपºया, खोक्यांचे नुकसान झाले. इतर काहींनी तर संधी साधून घटनास्थळावरून पलायन केले. याबाबत मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता अतिक्रमणांचा रहदारीला त्रास होत असून त्यामुळे तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमिवर ही कारवाई केली आहे. शहरात इतर ठिकाणी असलेली अतिक्रमणेही स्वत:हून काढून घ्यावी अन्यथा कुणाचाही मुलाहिजा न करता थेट कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. अतिक्रमणधारकांना वारंवार सूचना देवूनही ते दाद देत नसतील तर थेट कारवाईशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. पालिकेच्या क्षेत्रीय अधिकाºयांनीही आपापल्या भागातील अतिक्रमणे काढण्यासाठी प्रयत्न न केल्यास कारवाईचा इशाराही दिला.
पदपाथ रिकामे होतील
शहरातील काही रस्त्यांवर पदपाथ आहेत. मात्र त्यावर अतिक्रमण झाल्याने नागरिकांना तेथून चालताही येत नाही. हे पदपाथ रिकामे करून नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. नगरपालिका यासाठीही मोहीम राबविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अतिक्रमणांवर जेसीबी चालविल्याने मात्र यात अनेकांच्या टपºया व खोक्यांचे नुकसान झाले. त्यामुळे टपरीधारकही संतप्त झाल्याचे दिसून आले. अतिक्रमणांचा रहदारीला त्रास होत असून त्यामुळे तक्रारी वाढल्याने हिंगोली शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली.
अतिक्रमणाच्या नावाखाली नुकसान केल्याचा आरोप
४अतिक्रमण हटाव मोहिमेत फुटकळ व्यापाºयांचे नुकसान केले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई करून संबधित अधिकाºयांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना व्यापाºयांनी दिले. पालिकेने जेसीबीचा वापर करून फुटकळ व्यापाºयांची दुकाने, टपरी, गाडे, खोके तोडून टाकले. विनंती करूनही वेळ दिला नाही. परिणामी, मोठे नुकसान झाले. त्यामुळे भरपाई द्यावी तसेच अतिक्रमण हटाव करताना अधिकारी क्षेत्रीय अधिकारी, जेसीबीचालक यांनी नाहक अतिरेकी भूमिका घेतली. बसस्थानक परिसरात टपरीत तौफिक शेख हा मुलगा बसलेला असताना जेसीबी चालविली. सुदैवाने उडी मारल्याने तो बचावल्याचे निवेदनात म्हटले आहे. फुटकळ व्यापारी सोमवारी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन अधिकाºयांवर कारवाईची मागणी करणार आहेत. निवेदनावर राजेंद्र दुबे, विश्वास मादेवाड, शेख अहमद, घनश्याम राखुंडे, फेरोजखान पठाण आदींंच्या स्वाक्षºया आहेत.
राकाँच्या फलकावरून वाद
४शहरातील वंजारवाडा भागात १२ जानेवारी रोजी नगर परिषदेतील राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून राष्टÑवादी काँग्रेस पार्टीचा फलक पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने पाडल्याचा आरोप राकाँचे जिल्हा सरचिटणीस बी. डी. बांगर यांनी केला. रविवारी होणाºया कार्यक्रमात फलक न दिसावा यासाठी केलेला हा खटाटोप राष्टÑवादी काँग्रेस पार्टीने हाणून पाडून शाखेची पाटी अखेर त्याच जागी लावल्याचे पत्रक त्यांनी काढले. सदर फलक पालिकेने काढून टाकल्यानंतर राकाँचे आ. रामराव वडकुते, जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, बालाजी घुगे आदींनीही मुख्याधिकाºयांना जाब विचारला. त्यानंतर लगेच फलक आहे त्याच जागी लावला. यावेळी तालुकाध्यक्ष माधव कोरडे, शहराध्यक्ष जावेद राज, केशव शांकट, इरफान पठाण आदी हजर होते.

Web Title:  Removal of encroachment in Hingoli ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.