हिंगोलीत पुन्हा अतिक्रमण हटाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 11:54 PM2018-01-05T23:54:51+5:302018-01-05T23:54:57+5:30

शहरातील नगर परिषद हद्दीतील मुख्य रस्त्यालगतचे अनधिकृत अतिक्रमणावर पालिकेचा पुन्हा एकदा हातोडा पडणार आहे. पालिकेने केलेली वृक्षलागवडीतील रोपांची नासधूस तसेच रहदारी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे ज्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांनी येत्या तीन दिवसांत अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन हिंंगोली नगर परिषदेकडून करण्यात आले.

 Removal of encroachment again in Hingoli | हिंगोलीत पुन्हा अतिक्रमण हटाव

हिंगोलीत पुन्हा अतिक्रमण हटाव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील नगर परिषद हद्दीतील मुख्य रस्त्यालगतचे अनधिकृत अतिक्रमणावर पालिकेचा पुन्हा एकदा हातोडा पडणार आहे. पालिकेने केलेली वृक्षलागवडीतील रोपांची नासधूस तसेच रहदारी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे ज्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांनी येत्या तीन दिवसांत अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन हिंंगोली नगर परिषदेकडून करण्यात आले.
हिंगोली शहरात पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाणार आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे चांगलेच धाबे दणाणणार आहेत. यापूर्वीही पालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.
छोट्या व्यापाºयांकडून यास विरोध झाला. परंतु अनधिकृत अतिक्रमण हटविली होती. सहा महिन्यांपूर्वी हिंगोली शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली होती. परंतु अनेकांनी परत अतिक्रमण केल्याने ‘जैसे थे’ परिस्थिती झाली. या कालावधीत अतिक्रमण हटावला बे्रक लागला होता. मात्र अनधिकृत अतिक्रमणधारकांची संख्या वाढतच चालल्याने शहरातील रहदारीचा प्रश्न तसेच रोपांची नासधूस होत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. त्यामुळे आता परत एकदा हिंगोली शहरातील अतिक्रमणांवर हातोडा पडणार आहे. येत्या तीन दिवसांत ही कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेने सांगितले. अधिनियमानुसार होणार कार्यवाही - महाराष्टÑ प्रादेशिक नगर-रचना अधिनियम १९६६ व महाराष्टÑ नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ अन्वये अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन रहदारी वाढत असल्यामुळे स्वत:हूनच अतिक्रमण काढण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सूचना देऊनही अतिक्रमण न हटविल्यास ते काढते वेळेस होणाºया नुकसानची जबाबदारी पालिकेवर राहणार नाही.
नगर परिषद हद्दीतील बिरसा मुंडा चौक, देवडानगर, एनटीसी, औंढारोड, बसस्थानक, महावितरण कार्यालय, इंदिरा गांधीचौक, महेश चौक, महावीर चौक, आंबेडकर चौक, रेल्वेस्टेशन रोड, जुने पोलीस अधीक्षक कार्यालय, टपाल कार्यालय रोड, अष्टविनायक चौक, खुराणा पेट्रोलपंपाजवळील परिसर
जवाहर रोड, भाजीमंडई, पलटण मस्जीद, अकोला रोड, पिपल्स बँक परिसर, न्यायालयासमोर, पलटण पाण्याची टाकीजवळील, रिसाला नाका व शहरातील मुख्य रस्त्यालगतचे तसेच इतर प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण हटविले जाणार आहे.
नगर परिषदेला सहकार्य करून शहरातील मुख्य चौक तसेच रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी केले आहे. पोलीस बंदोबस्तात कारवाई होणार आहे.

Web Title:  Removal of encroachment again in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.