एकता गु्रपतर्फे कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:22 AM2019-01-03T00:22:53+5:302019-01-03T00:23:30+5:30

जिल्हा एकता ग्रुप ‘बीफोरयु’ तर्फे हिंगोली शहरात कार्यक्रम घेण्यात आला. एखाद्या ठिकाणी अपघाताची घटना घडल्यास अपघातस्थळी जाऊन जखमींना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून गु्रपची स्थापना करण्यात आली आहे.

 Program by Ekta Group | एकता गु्रपतर्फे कार्यक्रम

एकता गु्रपतर्फे कार्यक्रम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा एकता ग्रुप ‘बीफोरयु’ तर्फे हिंगोली शहरात कार्यक्रम घेण्यात आला. एखाद्या ठिकाणी अपघाताची घटना घडल्यास अपघातस्थळी जाऊन जखमींना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून गु्रपची स्थापना करण्यात आली आहे. सदर माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावी, या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक सुधाकर आडे, वाहतूक शाखेचे पोनि सुडके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, एकता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप ठाकरे, अमित रूहाटिया, बबलू पठाण, मंचक खंदारे एकता ग्रुप ट्रान्सपोर्टचे जिल्हाध्यक्ष दौलत पठाण, जिल्हा अध्यक्ष शेख महेबूब, सुनील काकडे आरिफ वासेसा व जिल्हा संघटक सदाशिव धुळे व गु्रपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. तसेच अपघात विषयावर माहिती दिली.

Web Title:  Program by Ekta Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.