रुग्णालये, आश्रमशाळांचा घेतला धांंडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:13 PM2018-01-12T23:13:39+5:302018-01-12T23:13:42+5:30

विधानसभा सदस्यांच्या गठीत आश्वासन समितीद्वारे आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालय, अंगणवाडी, गोटेवाडी येथील आदिवासी आश्रमशाळा, येलकी येथील अंगणवाडीची पाहणी करण्यात आली. आमदार, अधिकारी यांच्या समितीद्वारे या पाहणी बाबतचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात येणार आहे.

 The hospitals, and the ashram schools took away | रुग्णालये, आश्रमशाळांचा घेतला धांंडोळा

रुग्णालये, आश्रमशाळांचा घेतला धांंडोळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : विधानसभा सदस्यांच्या गठीत आश्वासन समितीद्वारे आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालय, अंगणवाडी, गोटेवाडी येथील आदिवासी आश्रमशाळा, येलकी येथील अंगणवाडीची पाहणी करण्यात आली. आमदार, अधिकारी यांच्या समितीद्वारे या पाहणी बाबतचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात येणार आहे.
महाराष्टÑ शासनाच्या वतीने विधानसभेची आश्वासन समितीने कळमनुरी तालुक्यातील आरोग्य महिला व बालविकास, आदिवासी आश्रमशाळा या केंद्राची पाहणी केली. वसमतचे आ. डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली समितीत आ. तान्हाजी मुटकुळे, आ. प्रकाश कातर्पेकर, आ. काशिराम पावरा, अव्वर सचिव जयवंत राणे, सहा. कक्ष अधिकारी विजय कदम, राजेश राणे, प्रतिवेदक सतीष भोगल, विठ्ठल खर्च यांचा समावेश आहे. या समितीने दुपारी ३.३० वाजता आखाडा बाळापूर येथील अंगणवाडीची पाहणी केली. त्यानंतर हा ताफा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मंगेश टेहरे, बाह्य संपर्क अधिकारी डॉ. गोपाळ कदम, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख, डॉ. सतीश रुणवाल, डॉ. सुकळीकर, डॉ. नरवटे, डॉ. नाकाडे, डॉ. राजेश कत्रुवार, डॉ. खुडे यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. यावेळी समितीने रुग्णालयातील सोयी-सुविधांची माहिती घेतली. काही कागदपत्रे तपासली, रुग्णांशी संवाद साधला. त्यानंतर गोटेवाडी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेची पाहणी केली. वर्गखोल्या, पिण्याच्या पाण्याची सुविधा, गरम पाणी, जेवणाची सोय याबाबत विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. त्यानंतर येलकी येथील अंगणवाडीचीही पाहणी केली. या पाहणीचा अहवाल विधानसभेत सादर करणार असल्याचे समितीप्रमुख डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी सांगितले.
ग्रामीण रुग्णालय चकचकीत, कर्मचारीही हाऊसफुल्ल
बाळापूरचे ग्रामीण रुग्णालयात प्रथमच चकचकीत करण्यात आले. खुद्द जिल्हा शल्यचिकित्सक व सर्वच अधिकारी जातीने हजर राहून प्रत्येक विभाग अपडेट झाला की नाही याची खातरजमा करून घेत होते. त्यामुळे नियमित व परिपुर्ण कर्मचारी नसतानाही आज मात्र रुग्णालयात कर्मचारी वर्ग हाऊसफुल्ल होते.
नाय.. नो.. नेव्हर..
रुग्णालयात तीन वर्षापासून वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त होती. पण समिती येणार असल्याने दोन दिवसांपुर्वीच तीनही वैद्यकीय अधिकाºयांची पदे भरलीत. त्यामुळे समितीने कर्मचारी- अधिकारी पूर्ण असल्याचे सांगत प्रत्येक प्रश्नाला हो चाच पाढा गायला. कोणत्याच बाबी नाही म्हणून सांगितल्या नाहीत. त्यामुळे समिती अध्यक्ष डॉ. मुंदडा यांनीही आश्चर्य व्यक्त केले. आरोग्य विभागाचे नाय... नो... नेव्हरचा पाढा किती दिवस टिकतो, हे कळेलच पण सध्या तरी त्यांचा होकार सत्कारणी लागला.
आदिवासी प्रकल्पास भेट
दरम्यान, आश्वासन समितीच्या वतीने आदिवासी प्रकल्प कार्यालय कळमनुरी येथेही भेट देण्यात आली. या कार्यालयात आश्रमशाळांसह या प्रकल्पातर्फे राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांची माहिती विचारण्यात आली. प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांनी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमही सांगितले.
दर्शनासाठी घाई : पाहणीत मन रमेना
या आश्वासन समितीमधील मुंबईच्या सदस्यांना अंगणवाडी, रुग्णालय पाहणी करण्यात फारसा रस वाटला नाही. पाहणी करून शासनाला सुचना, दुरूस्ती, बदल सुचविण्यासाठी ही समिती असली तरी गांभिर्याने पाहणी करण्याऐवजी औंढा येथील नागनाथाचे दर्शन करून देवगिरी पकडण्यासाठी ते घाई करत
होते. थातूर-मातूर पाहणी करत उपचार पुर्ण करत होते व चला निघाचा सुर आळवित होते. पण समिती अध्यक्ष डॉ. मुंदडा व आ. मुटकुळे मात्र बारकाईने समस्या जाणून घेत होते. त्या कशा सोडवायच्या याचाही ते विचारविनिमय करीत होते.
समिती सदस्य आरोग्य सुविधा, लाभार्थी, कागदपत्रे यांची पाहणी करत होते. तर आ. मुटकुळे मात्र स्वच्छतागृह, बाह्यरुग्ण विभागाची स्वच्छता अशी स्वच्छतेची पाहणी करत होते. ते खºया अर्थाने स्वच्छतेचे पाईक दिसले.

Web Title:  The hospitals, and the ashram schools took away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.