पोले खून प्रकरण :पाळत ठेवणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 11:57 PM2018-01-05T23:57:34+5:302018-01-05T23:57:38+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पोले यांचे अपहरण करून आरोपींनी निघृणपणे हत्या केली. अत्यंत नियोजित व विचारपूर्वक केलेल्या खुन प्रकरणात आरोपींनी एकाजवळून उसने पैसे घेणे व मयत सर्जेराव पोले यांच्यावर पाळत ठेवणे यावरून या गुन्ह्याचा तपास लावणे पोलिसांना सोपे झाले व आरोपींचा पर्दाफाश झाला.

 Hole murder case: The cost of surveillance | पोले खून प्रकरण :पाळत ठेवणे पडले महागात

पोले खून प्रकरण :पाळत ठेवणे पडले महागात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पोले यांचे अपहरण करून आरोपींनी निघृणपणे हत्या केली. अत्यंत नियोजित व विचारपूर्वक केलेल्या खुन प्रकरणात आरोपींनी एकाजवळून उसने पैसे घेणे व मयत सर्जेराव पोले यांच्यावर पाळत ठेवणे यावरून या गुन्ह्याचा तपास लावणे पोलिसांना सोपे झाले व आरोपींचा पर्दाफाश झाला.
वडहिवरा येथील माजी पंचायत समिती सदस्य तथा सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पोले यांची अत्यंत निघृणपणे अपहरण करून हत्या केली. शेतीच्या किरकोळ वादावरून सुपारी देवून झालेल्या खून प्रकरणाने सेनगाव तालुक्यात खळबळ उडाली. अत्यंत अमानवीयपणे आरोपींनी हातपाय बांधून, गळा बांधून खून केला. प्रारंभी अपहरण वाटणाºया या प्रकरणात आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पोले यांच्या खुनाचा कट रचला. या प्रकरणातील प्रमुख आरोपी हरिभाऊ सातपुते याने आपला साडभाऊ रतन हरिभाऊ खडके व नाशिक येथील इतर चार आरोपींनी पोले यांचे अपहरण व खून प्रकरणात मोठी सावधगिरी बाळगत कोणतेही धागेदारे मागे ठेवले नव्हते. पोले यांच्या मागावर आरोपी २५ डिसेंबरपासून होते. पोले यांना अज्ञात स्थळी गाठण्याची संधी मारेकरी शोधत होते. ही संधी त्यांना १ जानेवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास मिळाली व त्यात ते यशस्वी झाले. या खुनाचा छडा लागणार नाही, याकरिता आरोपींनी मोबाईल क्रमांकापासून अन्य सर्व सावधगिरी बाळगत मागे कोणताही पुरावा सोडला नव्हता. परंतु गुन्हा करणारा आरोपी कितीही चतुर असला तरीही मागे पुरावा सोडतो आणि ते शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर असते. पोले खून प्रकरणातही तेच झाले. मारेकºयांनी नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या या खुन प्रकरणात आरोपी रतन खडके याने मयत सर्जेराव पोले यांच्यावर पाळत ठेवणे हे त्यांच्या अंगलट आले. खडके हा पोले यांच्यावर पाळत ठेवत असल्याचा प्रकार त्यांचा खून झाल्याच्या प्रकारानंतर काही वाहनधारकांनी सांगितला.
आणखी आरोपींना पकडण्यास पथक नाशिककडे
प्रमुख आरोपी हरिभाऊ सातपुते याच्या सांगण्यावरून हत्ता येथील एकाने रतन खडके यास घटनेच्या दिवशी ६ हजार रुपये देण्यास सांगितले होते. सदर सहा हजार रुपये रक्कम खडके याने मारेकºयांना दिली. हा व्यवहार पोले यांच्या अपहरणानंतर पोलिसांना समजला. हे दोन प्रमुख धागेदोरे घेवून केलेल्या तपासात आरोपी अलगद जाळ्यात आले. खून प्रकरणाचा भांडाफोड करण्यात पोलिसांना ७५ तासांतच यश मिळाले. यात दोन आरोपींना अटक केली असून एकूण आरोपींची संख्या सहा असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. अन्य आरोपींना अटक करण्यासाठी फौजदार किशोर पोटे यांचे पथक नाशिककडे रवाना झाले आहे.

Web Title:  Hole murder case: The cost of surveillance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.