हिंगोलीचे रेशीम उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:48 PM2017-12-28T23:48:59+5:302017-12-28T23:49:07+5:30

रेशीम शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळत असल्याने शेतकºयांनी इतर पिकांना बगल देत रेशीम उद्योगावर भर दिला आहे. मात्र मागील दोन महिन्यांपासून रेशीम निर्माण करणाºया किड्यांना अज्ञात रोगाची लागण झाल्याने उत्पन्नात घट होत असल्याचे शेतकºयांतून बोलल्या जात आहे.

Hingoli's silk farming farmers worry | हिंगोलीचे रेशीम उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

हिंगोलीचे रेशीम उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

googlenewsNext
ठळक मुद्देउत्पन्नात घट : पहिल्यांदाच वाईट अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : रेशीम शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळत असल्याने शेतकºयांनी इतर पिकांना बगल देत रेशीम उद्योगावर भर दिला आहे. मात्र मागील दोन महिन्यांपासून रेशीम निर्माण करणाºया किड्यांना अज्ञात रोगाची लागण झाल्याने उत्पन्नात घट होत असल्याचे शेतकºयांतून बोलल्या जात आहे.
जिल्ह्यात रेशीमचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कमी वेळात जास्त उपन्न देणारा हा उद्योग असल्याने शेतकºयांनी याच पिकाला सर्वाधिक जास्त पंसती दिली आहे. आज ३०० हेक्टरच्या वर तुतीची लागवड झाली आहे. त्यांना प्रत्येक क्राफ्टपासून उत्पन्नही चांगले मिळाले आहे. त्यामुळे शेतकºयांनी रेशीम शेतीवरच भर दिली आहे. पाचही तालुक्यातील गावात रेशीमची शेती सुरु झाली आहे. तर हिंगोली तालुक्यातील पांगरा, भांडेगाव आणि कडती येथे जवळपास २३ शेतकºयांनी दोन वर्षांपासून शेती करणे सुरु केले आहे. मात्र यावर्षी पहिल्यांदाच रेशीम उत्पादन करणारे किडे अंडकोषाबाहेर येताच काहीच हालचाली करीत नसल्याचे शेतकºयांच्या लक्षात आले. त्यामुळे शेतकºयांनी जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयाशी संपर्क साधून याबद्दलची माहिती दिली. अधिकाºयांनी भेटही देऊन विषबाधा झाल्याचे सांगितल्याचे शेतकरी नामदेव लिंबोळे यांनी सांगितले. विषबाधा झाली असती तर एकाच शेतकºयाच्या शेतात झाली असावी परंतु कडती आणि भांडेगाव येथील शेतकºयांनाही हीच अडचण भासत आहे.
नुकसान : विभागीय अधिकाºयांना कळविले
भांडेगाव येथे ३, पांगरी २ आणि कडती येथे १८ शेतकºयांनी रेशीम शेती केली आहे. आतापर्यंत चांगले उत्पन्न मिळाले. परंतु मागील दोन महिन्यांपासून रेशीम किडे मृत होत असल्याने उत्पन्नात घट होत आहे. हा प्रकार शेतकºयांनी विभागीय अधिकाºयांना मेलवर निवेदनाद्वारे कळविला आहे.

Web Title: Hingoli's silk farming farmers worry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.