रुजू झालेल्या अधिकाऱ्यांसमोर दुहेरी आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:36 AM2018-03-19T00:36:50+5:302018-03-19T00:36:50+5:30

येथील पंचायत समिती कार्यालयाचा अनागोंदी कारभारामुळे पंचायत समितीत आजपर्यंत रुजू झालेले गटविकास अधिकारी वर्षभरही टिकत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सेनगाव पं. स.चा कारभार पुर्णत: ढेपाळला असून नव्याने रुजू झालेल्या गटविकास अधिकाºयांसमोर आता दुहेरी आव्हान निर्माण झाले आहे.

 In front of the executed officers, a double challenge | रुजू झालेल्या अधिकाऱ्यांसमोर दुहेरी आव्हान

रुजू झालेल्या अधिकाऱ्यांसमोर दुहेरी आव्हान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : येथील पंचायत समिती कार्यालयाचा अनागोंदी कारभारामुळे पंचायत समितीत आजपर्यंत रुजू झालेले गटविकास अधिकारी वर्षभरही टिकत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सेनगाव पं. स.चा कारभार पुर्णत: ढेपाळला असून नव्याने रुजू झालेल्या गटविकास अधिकाºयांसमोर आता दुहेरी आव्हान निर्माण झाले आहे.
सेनगाव पंचायत समिती कार्यालयाला कारभार सर्वश्रुत आहे. कार्यालयात प्रामुख्याने अकार्यक्षम, कामचुकार, कारवाई होऊन पदस्थापना मिळालेल्या अधिकारी कर्मचाºयांचा भरणा जास्त आहे. दौºयांच्या नावाखाली कार्यालयातील कार्यरत कर्मचारी -अधिकारी सातत्याने गैरहजर राहतात. कार्यालयात उशिरा येणे, अनधिकृत गैरहजर राहणे, सर्वसामान्य नागरिकांशी उद्धट वागणे, कार्यालयात मद्यप्राशन करून येणे, कामात अनियमितता, मुख्यालयी न राहणे अशा अनेक प्रकारामुळे सेनगाव पंचायत समिती चांगलीच चर्चेत येत आहे.
सेनगाव येथील पंचायत समितीला पूर्णवेळ गटविकास अधिकारी मिळत नाही अन् मिळाला तर सदर गटविकास अधिकाºयांवर कारवाई होते. किवा हे अधिकारी सहा महिने- वर्षभरात बदली करून आपली सुटका करून घेतात, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
या गोंधळात पंचायत समितीचा कारभार कायम प्रभारी गटविकास अधिकाºयांवर लादला जातो. त्यामुळे तालुक्यातील जनता पुरती वैतागली असून पदाधिकारीही हतबल झाले आहेत. त्यातच गेल्या आठवड्यात पं. स. च्या सर्व पदाधिकाºयांनी एकत्र येऊन कार्यालयाला टाळे ठोकण्याच्या नामुष्कीची वेळ ओढावली होती. पंरतु निगरगट्ट अधिकारी -कर्मचाºयांवर या प्रकाराचा कुठलाही परिणाम झाला नसून मनमानी कार्यपद्धती चालूच आहे.
या खडतर परिस्थितीत शनिवारी गटविकास अधिकारीपदी के.व्ही.काळे रुजू झाले. सेनगावला नवीन गटविकास अधिकारी मिळाल्याने मात्र जनतेच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. पं.स.चा ढेपाळलेला कारभार सुधारावा अशी जनतेची मागणी आहे. रुजू झालेले गटविकास अधिकारी काळे यांच्यासमोर सेनगाव पं.स. कार्यालयाचा कारभार सुधारणे त्याच बरोबर तीन वर्ष टिकण्याचे आव्हान आहे. विशेष म्हणजे नवीन रूजू झालेले अधिकारी खरंच बदल करतील काय? सेनगाव पंचायत समितीचा ढेपाळलेला कारभार सुधारेल का? तसेच कार्यालयातील उशिरा येणाºया कर्मचाºयांना आळा बसेल काय? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हे सर्व प्रश्न सुटल्यास खरोखरच पंचायत समितीचा कारभार सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

Web Title:  In front of the executed officers, a double challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.