Ekam Harij in Kalamnuri; The crime filed against eight people | कळमनुरी येथे एकास मारहाण; आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल
कळमनुरी येथे एकास मारहाण; आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : ‘तू आमच्यासोबत बाहेरगावी जमातला का येत नाही’ या कारणावरून शेख आसेफ शेख हयादु यांना मारहाण केल्याची घटना २५ मार्च रोजी कळमनुरी येथे घडली. याप्रकरणी आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळमनुरी शहरातील दर्गा मोहल्ला येथील शेख आसेफ शेख हयादू यांच्यासोबत काही जणांनी संगनमत करून वाद घातला. तसेच त्यांना तू आमच्यासोबत बाहेरगावी जमातला का येत नाही, या कारणावरून इम्रान खाँन यांनी लोखंडी सळईने मारहाण केली. तर शेख हारून याने काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. व इतर आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून थापड-बुक्क्यांनी मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी शेख आसेफ शेख हयादू यांच्या फिर्यादीवरून सय्यद अमझत स. हसन अली, शेख हारून शेख दौलत, इम्रान खान मोहब्बत खान, शेख मुस्तदिक, नशीरोदद्दीन, स. कलीम खदीर अत्तार, डॉ. स. मोशीन अली, सिराज शेख समदानी यांच्याविरूद्ध विविध कलमांन्वये कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोउपनि जाधव करीत आहेत.
मारहाण प्रकरणातील काही आरोपी कळमनुरी तर काही हिंगोली येथील आहेत.


Web Title:  Ekam Harij in Kalamnuri; The crime filed against eight people
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.