‘बालरक्षक’ घेणार बालकांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:59 PM2018-10-06T23:59:57+5:302018-10-07T00:00:22+5:30

जिल्ह्यातील १३६५ शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यात बालरक्षकाची महत्वाची भुमिका असणार असून तालुकानिहाय कार्यशाळा व बैठकींचे आयोजन केले जात आहे. जिल्ह्यात सतत ५७७ गैरहजर तर ७८८ कधीच शाळेत न जाणाऱ्या बालकांना शाळेत प्रवेशित करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे.

 Children's search for 'childcare' | ‘बालरक्षक’ घेणार बालकांचा शोध

‘बालरक्षक’ घेणार बालकांचा शोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील १३६५ शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यात बालरक्षकाची महत्वाची भुमिका असणार असून तालुकानिहाय कार्यशाळा व बैठकींचे आयोजन केले जात आहे. जिल्ह्यात सतत ५७७ गैरहजर तर ७८८ कधीच शाळेत न जाणाऱ्या बालकांना शाळेत प्रवेशित करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी प्राधिकरणावर आहे. आरटीई कायद्याची प्रभावीपणे अंमजबावणीसाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु आजघडीला जिल्ह्यात हजारो मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून त्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देणे बंधनकार आहे. जास्तीत जास्त शाळाबाह्य मुलांना शाळेत कसे दाखल करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवता येईल यासाठी धडपड सुरू आहे. शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी बालरक्षक संकल्पना पुढे आली. इतर जिल्ह्यात ही संकल्पा यशस्वी होत आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात बालरक्षकांच्या मदतीने शाळेत न येणाºया मुलांची शोध मोहिम घेण्यात येणार आहे. हिंगोली तालुक्यात २४ बालरक्षक आहेत. तर कळमनुरी ८८, वसमत ८४, औंढा नागनाथ ४० बालरक्षक शिक्षक आहेत.
जिल्ह्यातून काही कुटुंबाचे सहा महिन्या करीता तर काही ३ व २ महिन्याकरीता स्थलांतर होते. कुटुंबासोबत मुलांचेही स्थलांतर होऊन त्यांच्या शिक्षणात खंड पडतो. ही मुले अभ्यासातही मागे पडतात, त्यानंतर शाळाबाह्य होतात. त्यामुळे या मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठवेण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहिम राबविण्यात येत आहे. बालरक्षकामार्फत शाळेत न जाणाºया मुलांना थेट जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. बालरक्षकाची चळवळ गतिमान करून जिल्ह्यात एकही बालक शाळाबाह्य राहणार नाही याची दखल घेतली जाणार आहे. संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने मोहिम राबविली जाणार आहे.
बालकामगारांना त्यांच्या जवळच्या शाळेत नियमित शाळेत प्रवेशित करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. याची दखल घेत तालुकास्तराव कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. ६ आॅक्टोबर रोजी हिंगोली येथे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, उप शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले उपस्थित होते. जिल्हाधिकाºयांनी आदेश देताच शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची शोध मोहिम प्रभाविपणे राबविण्याची तयारी करण्यात आली आहे. सेनगाव येथील गटसाधन केंद्रात ९ आॅक्टोबर रोजी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. तर वसमत ११ आॅक्टोबर कळमनुरी १७ आॅक्टोबर औंढा नागनाथ १५ आॅक्टोबर. अधिव्याख्याता देठे, जिल्हा समन्वयक सुदाम गायकवाड मार्गदर्शन करतील.

Web Title:  Children's search for 'childcare'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.