कोषागारात बिलांचा उशिरापर्यंत ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:28 AM2018-04-01T00:28:53+5:302018-04-01T00:28:53+5:30

येथील कोषागार कार्यालयात बिले सादर करण्यासाठी विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी एकच घाई करीत होते. शेवटच्या दिवशी होणारी घाई थांबविण्यासाठी १४ मार्च रोजी निघालेल्या शासन निर्णयानुसार २३ मार्चपर्यंत सर्वच विभागाची बिले मागितली होती. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुरळक प्रमाणात या कार्यालयात रेलचेल होती.

 The bills are wrapped up in the treasury | कोषागारात बिलांचा उशिरापर्यंत ओघ

कोषागारात बिलांचा उशिरापर्यंत ओघ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील कोषागार कार्यालयात बिले सादर करण्यासाठी विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी एकच घाई करीत होते. शेवटच्या दिवशी होणारी घाई थांबविण्यासाठी १४ मार्च रोजी निघालेल्या शासन निर्णयानुसार २३ मार्चपर्यंत सर्वच विभागाची बिले मागितली होती. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुरळक प्रमाणात या कार्यालयात रेलचेल होती.
वर्षाच्या शेवटच्या दिवशी कोषागार कार्यालयात बिले सादर करण्यासाठी दरवर्षी एकच घाई होत होती. त्यामुळे एकाच वेळी आलेल्या बिलांची तपासणी करणे शक्य होत नव्हते. यामध्ये काहीही कोंधळ होऊ शकतो. तो थांबविण्यासाठी यंदा पहिल्यांदाच दोन टप्प्यांत कोषागार कार्यालयात बिले सादर करण्याचा शासन निर्णय काढला होता. त्यानुसार २३ मार्चपर्यंत सायंकाळी उशिरापर्यंत बिले स्वीकारल्याचे जिल्हाकोषागार अधिकारी पंकज पुंडगे यांनी सांगितले. तर ३१ मार्च रोजीही दोन- दोन तासांचा वेळ बीडीएस काढण्यासाठी दिला जात होता. मात्र मागील आठ ते दहा दिवसांपासून ब्रॉड बॅण्ड सेवा अधून -मधून बंद पडत असल्याने अनेक अडचणी तर येत होत्याच त्या शेवटच्याही दिवशी कायम होत्या. मागील वर्षी एकाच टप्प्यात ११० कोटी रुपयांची देयके सादर करण्यात आली होती. ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ४५ कोटी ७२ लाख ९५ हजार ७७१ रुपयांची देयके सादर झाली होती. तर अजूनही देयके सादर करणे सुरुच होते. मात्र अधून - मधून बंद पडत असलेल्या ब्रॉडबॅण्ड सेवेमुळे अडचणी येत होत्या. बीडीएसवर पडणाऱ्या निधीबाबत विविध विभागाचे अधिकारी सजग असले तरीही तालुका स्तरावरील बीड साईटच सायंकाळी ६ वाजता वरिष्ठ स्तरावरूनच बंद केल्याने त्यांना बीलेच सादर करता येत नव्हती. त्यामुळे तेथील अधिकारी - कर्मचारी कोषागार कार्यालयातील अधिकाºयांना फोन करु- करुन भांबावून सोडत होते. तर वरिष्ठांच्या सूचनेनुसार बिले स्वीकारली जात होती. तशी कोषागार कार्यालयातील कर्मचाºयांची कामाची गतीही वाढत होती.
जिल्हा कोषागार कार्यालयात एकूण २४ पदे मंजूर असली तरीही केवळ ७ पदेच भरण्यात आली आहेत. त्यातही फक्त ४ कर्मचारी कामकाज पाहत असल्याने कामे करण्यास अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर सध्या कार्यालयाची इमारतच लहान असल्याने येथे नेहमीच दमट वातावरण आहे.
या विभागासाठी ३ कोटी रुपये खर्चून इमारतीचे काम पूर्णत्वास गेलेले असले तरीही कंत्राटदाराचे २६ लाख रुपये बाकी असल्याने कंत्राटदार इमारत ताब्यात देण्यास तयार नाही आणि वित्त विभागाकडून ती रक्कम अद्याप साबांकडे वर्ग झाली नाही.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी जिल्हा कोषागार कार्यालयास भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. विविध सूचना देत येथील अडचणीही ऐकून घेतल्या. नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी सोबत होते.

 

Web Title:  The bills are wrapped up in the treasury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.